चतुर्थ श्रेणी कामगारांची रिक्त पदे भरणार

By Admin | Updated: June 22, 2014 00:35 IST2014-06-22T00:35:12+5:302014-06-22T00:35:12+5:30

वाहतूक पोलिसांनी ‘ऑपरेशन ईगल’ या विशेष मोहिमेत मुंबईतील 51 हजार नियम तोडणा:या बेशिस्त चालकांविरोधात कारवाई केली.

Fourth grade workers fill their vacancies | चतुर्थ श्रेणी कामगारांची रिक्त पदे भरणार

चतुर्थ श्रेणी कामगारांची रिक्त पदे भरणार

>मुंबई : वाहतूक पोलिसांनी ‘ऑपरेशन ईगल’ या विशेष मोहिमेत मुंबईतील 51 हजार नियम तोडणा:या बेशिस्त चालकांविरोधात कारवाई केली. 28 मे 15 जून या कालावधीत शहरात पार पडलेल्या कारवाईत 44.15 लाख रुपयांचा दंड जमा करण्यात आला. नो पार्किग, सिग्नल तोडणो अशा विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. ‘ऑपरेशन ईगल’अंतर्गत वाहतूक पोलिसांनी शहरातील 25 ठिकाणांवर ही कारवाई केली. ‘ऑपरेशन ईगल’ची ही कारवाई सकाळी 8 ते रात्रौ 8 या वेळेत पार पडली. ऑपरेशन ईगलमध्ये एकूण 51 हजार 47 चालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यात 22 हजार 293 चालकांनी हेल्मेट घातले नव्हते, तर 17 हजार 2क्3 चालकांनी वाहतुकीदरम्यान सिग्नल तोडला. कारवाईत 7 हजार 591 चालकांनी ङोब्रा क्रॉसिंग नियम आणि 3 हजार 768 चालकांनी ‘नो एण्ट्री’ नियमाचे उल्लंघन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Fourth grade workers fill their vacancies