शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांच्या चिमुरडीवर भांडुपच्या शाळेत बलात्कार

By admin | Updated: December 18, 2014 10:16 IST

चार वर्षांच्या विद्यार्थिनीवर शाळा अधिकाऱ्याने केलेले लैंगिक अत्याचार कुटुंबीयांनी लाजेखातर दडवून ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे

मुंबई : चार वर्षांच्या विद्यार्थिनीवर शाळा अधिकाऱ्याने केलेले लैंगिक अत्याचार कुटुंबीयांनी लाजेखातर दडवून ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भांडुपमधील एका खासगी शाळेत हा प्रकार घडल होता. याहून धक्कादायक बाब ही, की त्रास होऊ लागल्याने ही चिमुरडी भांडुपच्या सावित्रीबाई फुले व घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी आली. सर्व प्रकार समजूनही रुग्णालयाने या गुन्ह्याची माहिती पोलिसांना दिली नाही.भांडुप पश्चिमेकडील तुलशेत पाडा परिसरात असलेल्या माउंट मेरी या खासगी शाळेत ९ डिसेंबर रोजी ज्युनिअर केजीत शिकणाऱ्या चार वर्षांच्या चिमुरडीसोबत हा प्रकार घडला. मधल्या सुटीत शौचालयात गेलेल्या चिमुरडीसोबत शाळेच्या प्रशासकीय विभागात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेल्या केसरीनंदन उपाध्याय (३२) ऊर्फ छोटू सर याने लैंगिक चाळे केले. आई, मावशीसोबत आजोळी राहणाऱ्या या चिमुरडीने संध्याकाळी घरी जाताच घडला प्रकार आजीच्या कानावर घातला. घाबरलेल्या आजीने कुटुंबाला या प्रकाराची माहिती दिली. मात्र या प्रकाराचा बोभाटा झाल्यास अब्रू जाईल, समाजात नाक कापले जाईल या विचाराने कुटुंबाने पोलीस ठाणे गाठून तक्रार देणे टाळले. 

दरम्यान, रात्री उशिरा या चिमुरडीच्या पोटात वेदना होऊ लागल्या. दुसऱ्या दिवशी, १० डिसेंबरला आजीने चिमुरडीला भांडुपच्या सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहात उपचारार्थ नेले. तेथील डॉक्टरांना घडला प्रकारही सांगितला. मात्र हे प्रसूती गृह आहे. येथे नातीवर उपचार होणार नाहीत असे सांगून डॉक्टरांनी आजीला राजावाडी रूग्णालय गाठण्याचा सल्ला दिला. सोबत प्रसुतीगृहाची रूग्णवाहिका जोडून दिली. राजावाडी रूग्णालयातही आजीने नातीवर घडला प्रकार सांगितला. राजावाडी रूग्णालयातून उपचार घेऊन त्याच दिवशी चिमुरडी घरी परतली.मात्र १२ डिसेंबरला चिमुरडीचा त्रास वाढला. तिला असह्य वेदना होऊ लागल्या. त्यामुळे कुटुंबियांनी चिमुरडीला पुन्हा राजावाडी रूग्णालयात नेले. मात्र बाह्यरूग्ण विभागातील डॉक्टर निघून गेल्याने चिमुरडीला तसेच घरी आणण्यात आले.दरम्यान, काल संध्याकाळी परिसरातील स्वयंसेवी संस्थेने चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या पर्यवेक्षकाविरोधात गुन्हा का दाखल करत नाही, असा जाब भांडुप पोलिसांना विचारला. तोवर भांडुप पोलिसांना असा काही प्रकार घडला असेल याची कल्पनाही नव्हती. अचानक झालेल्या या हल्ल्याने पोलीसही गांगरले. अखेर स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने भांडुप पोलिसांनी या चिमुरडीचे घर शोधून काढले. चिमुरडीला विश्वासात घेऊन बोलते केले. सोबत कुटुंबियांकडेही चौकशी केली. तेव्हा ९ डिसेंबरला घडलेला प्रकार समोर आला. सोबत कुटुंबियांना गुन्हा नोंदिवण्यास वाटलेल्या लाजेसोबत महापालिका रूग्णालयांचा भोंगळ कारभारही उघड झाला.चिमुरडीने बोट दाखवताच आरोपी गजाआडकाल रात्री भांडुप पोलिसांनी या लहान मुलीचा, तिच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवून घेतला. त्यात मुलीने छोटू सरांनी (आरोपी केसरीनंदन उपाध्याय)केलेल्या अत्याचाराची माहिती दिली. पोलिसांना छोटू सर इतकेच आरोपीचे नाव माहिती होते. त्यामुळे आज सकाळी शाळा उघडताच पोलिसांनी तेथे कार्यरत असलेल्या सर्वच पुरूषांना पोलीस ठाण्यात आणले आणि चिमुरडीसमोर उभे केले. तेव्हा चिमुरडीने आरोपी उपाध्याय उर्फ छोटू सर याच्याकडे बोट दाखवताच पोलिसांनी त्याला अटक केली. उपाध्यायविरोधात भांडुप पोलिसांनी बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचारातील कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे. उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाईल.आरोपी आणि तक्रारदार मुलीच्या वैद्यकीय चाचण्या पार पडल्या असून त्यांचे अहवाल येणे बाकी आहे. तूर्तास आरोपी अटकेत आहे. उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाईल. त्यानंतर त्याच्या पार्श्वभुमीबाबत तपास केला जाईल, - प्रताप चव्हाण, वरिष्ठ निरिक्षक, भांडुपरूग्णालयांचीही होणार चौकशीचिमुरडीवर लैंगिक अत्याचार घडल्याची माहिती असूनही ती पोलिसांना न देणाऱ्या सावित्रीबाई फुले व राजावाडी रूग्णालयातील संबंधीत डॉक्टर व कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे, असेही चव्हाण यांनी लोकमतला सांगितले.ही चिमुरडी रूग्णालयात आली होती. मात्र उपचारांआधीच तिचे पालक तिला घेऊन निघून गेले. ते परत आलेच नाहीत. रूग्णालयातील डॉक्टरांना या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती होती. पण चिमुरडीची तपासणी झाली नव्हती.विद्या ठाकूर, वैद्यकीय अधिक्षक, राजावाडी रूग्णालय---शाळेच्या मान्यतेबाबतही होणार चौकशीही शाळा खासगी आहे. शिक्षण विभागाने या शाळेला परवानगी दिली होती का हेही पडताळून पाहाणार, अशी माहिती वरिष्ठ निरिक्षक चव्हाण यांनी दिली.(प्रतिनिधी)