शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

चार नक्षलवाद्यांनी केली घिसू मट्टामीची हत्या

By admin | Updated: May 31, 2014 00:57 IST

एटापल्ली पंचायत समितीचे माजी उपसभापती घिसू मट्टामी यांची हत्या नक्षलवाद्यांच्या रॅपीड अँक्शन फोर्सच्या चार ते पाच नक्षलवाद्यांनी केल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे.

आठवड्यात दोन हत्या : राजकीय नेत्यांच्या हत्येमुळे दहशतगडचिरोली : एटापल्ली पंचायत समितीचे माजी उपसभापती घिसू मट्टामी यांची हत्या  नक्षलवाद्यांच्या रॅपीड अँक्शन फोर्सच्या चार ते पाच नक्षलवाद्यांनी केल्याचे प्राथमिक माहितीत  समोर आले आहे. एटापल्ली येथे गुरूवारी सायंकाळी ७.३0 वाजता पंचायत समिती सभापतीच्या निवासस्थानासमोर  मट्टामी बसून होते. त्यावेळी ४ ते ५ च्या संख्येत नक्षलवादी त्यांच्या दिशेने येताना त्यांना दिसले.  बाहेर नक्षलवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर त्यांनी  जीव वाचविण्यासाठी घरात प्रवेश केला. त्यांच्या  पत्नी पंचायत समितीच्या सभापती ललीता मट्टामी घरात होत्या. त्यांना गोळीबाराचा आवाज ऐकू  आला. परंतु तोपर्यंंत नक्षलवाद्यांनी  घरात शिरुन त्यांच्यावर ५ ते ६ गोळ्या झाडून त्यांना ठार करुन  नक्षलवादी पळून गेले होते.  याच दरम्यान गावाच्या बाहेर आणखी काही नक्षलवादी उभे होते, अशी एटापल्ली परिसरात चर्चा  आहे. त्यानंतर एटापल्ली ग्रामीण रूग्णालयात मट्टामी यांचा मृतदेह नेण्यात आला. परंतु तेथे त्यांच्या  मृतदेहावर शवविच्छेदन झाले नाही. त्यामुळे गडचिरोली येथे शुक्रवारी सकाळी जिल्हा सामान्य  रूग्णालयात शवविच्छेदन करून हालेवारा या त्यांच्या मूळ गावी मृतदेह पोहोचविण्यात आला. या  आठवड्यात नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात दोन राजकीय नेत्यांची हत्या केल्याने ग्रामीण  भागातील राजकीय वातावरण पुन्हा दहशतीखाली आले आहे. मध्यंतरी नक्षलवाद्यांवर पोलीस  वरचढ झाल्याचे चित्र निर्माण  झाले होते. परंतु आता पुन्हा नक्षलवाद्यांनी डोके वर काढले आहे.२५ मे रोजी रविवारी अहेरी तालुक्यातील निमलगुडम येथे माजी जि.प. सदस्य बापू तलांडी यांची  नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. या घटनेची शाई वाळते न् वाळते तोच एटापल्ली पंचायत  समितीच्या सभापती ललिता मट्टामी यांचे पती घिसू मट्टामी यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली.  यापूर्वीही एटापल्ली पंचायत समितीचे सभापती राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते केवल सावकार  अतकमवार यांचीही नक्षलवाद्यांनी सायंकाळच्याच वेळी भर चौकात हत्या केली होती. तसेच  सायंकाळच्या सुमारास कंत्राटदार संजय खेडेकर यांचीही एटापल्ली गावातच नक्षलवाद्यांनी हत्या  केली होती. गुरूवारची ही तिसरी हत्या आहे. रविवारी याच आठवड्यात नक्षलवाद्यांनी माजी जिल्हा  परिषद सदस्य बापू तलांडी यांचीही निमलगुडम गावाजवळ अहेरी तालुक्यात हत्या केली. मट्टामी हे  हालेवारा गावचे राहणारे आहेत. त्यांचे तेथे घर व शेती आहे. परंतु नक्षलवाद्यांच्या भितीपोटी त्यांनी  गाव सोडून देऊन एटापल्लीत घर थाटले होते. राजकीय, सामाजिक जीवनात वावरताना जनतेचे  अनेक प्रश्न त्यांनी मांडले होते. त्यामुळे ते नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर आले, अशी चर्चा आहे.  (जिल्हा प्रतिनिधी)