शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात चार शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: October 3, 2015 03:44 IST

सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. औरंगाबाद, बीड व नांदेड जिल्ह्यात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

औरंगाबाद : सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. औरंगाबाद, बीड व नांदेड जिल्ह्यात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गेवराई (जि. बीड) तालुक्यातील भोजगाव येथील भागवत भगवान काळे (४५) या शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरातील पत्र्याच्या आडूला शुक्रवारी सकाळी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्याकडे ३ एकर कोरडवाहू शेती आहे. काळे यांच्याकडे सोसायटीचे कर्ज व खासगी देणे असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. गेवराई(जि. बीड) शहरातील गौतम घनश्याम सुतार (रा. संघमित्र नगर, गेवराई) या अपंग शेतकऱ्याने मन्यारवाडी शिवारातील स्वत:च्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.तळणी (ता़ हदगाव, जि. नांदेड) येथील रंगराव काशीबा शिरडकर (५५) या शेतकऱ्याने नापिकी व कर्जाला कंटाळून १ आॅक्टोबर रोजी गळफास लावून आत्महत्या केली. चापानेर (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथील बालू किसन थोरात (५७) या शेतकऱ्याने सततच्या दुष्काळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. दुष्काळामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या घरातील मंडळींनी सांगितले.