गुंतवणूकदारांची चार कोटींची फसवणूक

By Admin | Updated: March 2, 2015 01:42 IST2015-03-02T01:42:03+5:302015-03-02T01:42:03+5:30

गुंतवणुकीवर सहा ते आठ टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखवत १४ गुंतवणुकदारांना चार कोटी आठ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार पुण्यात घडला

Four crores fraud of investors | गुंतवणूकदारांची चार कोटींची फसवणूक

गुंतवणूकदारांची चार कोटींची फसवणूक

पुणे : गुंतवणुकीवर सहा ते आठ टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखवत १४ गुंतवणुकदारांना चार कोटी आठ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार पुण्यात घडला. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
परेश अशोककुमार खेतान(३१, कोथरुड) असे संशयिताचे नाव आहे. त्यांच्या मालकीची बालाजी इन्व्हेस्टमेंट नावाची गुंतवणूक कंपनी आहे. या कंपनीत गुंतवणूक केल्यास सहा ते आठ टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यानुसार अजय लवळेकर (३१) आणि अन्य १४ ठेवीदारांनी एकूण चार कोटी आठ लाखांची गुंतवणूक केली. या ठेवींची मुदतपूर्ती झाल्यानंतरही पैसे परत न मिळाल्याने लवळेकर यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज केला होता. त्यावर चौकशीअंती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Four crores fraud of investors