Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 09:01 IST2025-07-01T09:00:55+5:302025-07-01T09:01:31+5:30

इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे दीर्घ आजाराने ३० जून रोजी लॉस एंजलीस येथे निधन झाले. 

Former ISRO senior scientist Vijay Pendse Dies at 80 | Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन

Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन

इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे दीर्घ आजाराने ३० जून रोजी लॉस एंजलीस येथे निधन झाले.  ते ८० वर्षांचे होते. पुणे विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. नंतर ते पाषाण येथील एआरडीई येथे कनिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम करीत असताना भारताचे रॉकेट मॅन,माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांनी त्यांची निवड थुंबा विषुवृत्तीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्रावर साहाय्यक शास्त्रज्ञ म्हणून केली. तिथे त्यांना डॉ.वसंत गोवारीकर यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली.

भारताने श्रीहरिकोटा येथे उपग्रह प्रक्षेपण केंद्र उभारण्यासाठी गोवारीकर यांना पाचारण केले. तेव्हा गोवारीकर यांनी जे साथीदार निवडले त्यात पेंडसे हेही होते. त्यांच्यावर अग्निबाणाच्या घन इंधन निर्मितीची जबाबदारी सोपविण्यात आली. हा विभाग स्वतंत्र काम करू लागला तेव्हां पेंडसे त्याचे प्रमुख बनले. भारताच्या एस एल व्ही- ३ आणि पी एस् एल व्ही प्रक्षेपणात घन इंधनाचा वापर केला गेला. १९९५ मध्ये अंतर्गत राजकारणाला कंटाळून स्वेच्छा निवृत्ती घेऊन ते इस्रोतून बाहेर पडले. कालांतराने ते अमेरिकेत मिशिगन येथे एका रासायनिक कंपनीत रसायन विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते.

Web Title: Former ISRO senior scientist Vijay Pendse Dies at 80

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.