शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

शिकाऱ्यांना पाच वर्षे सक्तमजुरी

By admin | Updated: June 19, 2014 00:53 IST

मेळघाटातील ढाकणा परिक्षेत्रात वाघिणीची शिकारप्रकरणीचा विदर्भातील पहिला निकाल येथील न्यायालयाने आज बुधवारी दिला. यात तिघांना पाच वर्षे सक्तमजुरी व रोख दंडाची शिक्षा सुनावली

वाघिणीची शिकार: विदर्भातील प्रकरणाचा पहिला निकालनरेंद्र जावरे - अमरावतीमेळघाटातील ढाकणा परिक्षेत्रात वाघिणीची शिकारप्रकरणीचा विदर्भातील पहिला निकाल येथील न्यायालयाने आज बुधवारी दिला. यात तिघांना पाच वर्षे सक्तमजुरी व रोख दंडाची शिक्षा सुनावली तर पुराव्याअभावी चौघांची निर्दोष सुटका करण्यात आली. मधुसिंग लहेरसिंग राठोड (३५), चिंतराम लहेरसिंग राठोड (४०), विनोद प्रेमलाल पवार (३० सर्व रा. सिनबन) असे न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत. पुराव्याअभावी सागरलाल पवार, नरविलाल पवार, रुचलेसिंग पवार व मिश्रीलाल चव्हाण या तिघांची निर्दोष सुटका करण्यात आली. उपरोक्त तिन्ही आरोपींना मुख्य न्यायदंडाधिकारी विशाल राजे यांच्या न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी रोख पन्नास हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्षे पुन्हा सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. विदर्भात गतवर्षी उघडकीस आलेल्या वाघशिकार प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागांतर्गत ढाकणा परिक्षेत्रातील वाघिणीच्या शिकार प्रकरणात तीन वेगवेगळे प्रकरण दाखल आहेत. त्यातील पहिल्या प्रकरणाचा निकाल बुधवारी सकाळी पहिल्या सत्रात लागला. नियंत्रण शाखा स्थापितढाकणा परिक्षेत्रात वाघिणीची शिकार प्रकरण उघडकीस आल्यावर मेळघाट वाईल्ड लाईफ क्राईम सायबर सेलची स्थापना करण्यात आली. त्यानंतरच वाघ बचाव मोहिमेला विदर्भात खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. वाघशिकार प्रकरणाचा स्वतंत्र तपास करुन शिकाऱ्यांच्या अटकेसाठी व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकारी ते कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेतले. दिल्ली, उत्तरांचल, आंध्रप्रदेश, ओरीसा, मध्यप्रदेश, तामिळनाडू या राज्यासह महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये धाडी टाकून आरोपींना ताब्यात घेतले. प्रत्येकवेळी नवीन माहिती पुढे येत असल्याने विदेशापर्यंत पोहचलेले तस्करीचे संबंध व वाघाच्या कातड्याची होणारी तस्करी उघडकीस आली. असे आहे प्रकरण-मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित ढाकणा परिक्षेत्रातील दक्षिण डोलार वनखंड क्रमांक ९०५ मध्ये ४ मार्च २०१३ रोजी एका वाघिणीची शिकार झाल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावर वन्यजीव विभागाने चौकशीला सुरुवात करताच सिनबन येथील उपरोक्त सात शिकाऱ्यांना अटक केली होती. घटनास्थळासह आरोपींनी वाघिणीच्या शिकारीची बरीच थक्क करणारी माहिती दिली होती. त्यावर व्याघ्र अधिकाऱ्यांनी देशभर धाडी टाकून जवळपास ४० शिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. ढाकणा प्रकरणातील शिकाऱ्यांच्या ताब्यातून रोख ३३ हजार ९०० रुपयांसह वाघिणीच्या रक्ताने माखलेले दगड, माती, वाघिणीचे मांस व शिकारीसाठी वापरलेले लोखंडी सापडा, सुरे, चाकू आदी साहित्य जप्त केले. त्यानंतर हे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी न्यायालयात दाखल केले होते. त्यानंतर बहुप्रतीक्षित वाघ शिकार प्रकरणाचा निकाल आज बुधवारी लागला. सरकारतर्फे अधिवक्ता उदय देशमुख यांनी बाजू मांडली. विदर्भातील पहिला निकाल-ढाकणा परिक्षेत्रातील वाघिणीच्या शिकारीचा निकाल मेळघाट वाईल्ड लाईफ क्राईम सायबर सेलसाठी पहिला ठरला आहे. याप्रकरणात माफीचा साक्षीदार असलेला अनिस राठोड याने न्यायालयात बयाण बदलविल्यामुळे प्रकरणातील आरोपी निर्दोष तर सुटणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात होती.