नाशिक धान्य घोटाळ्यात ५ रेशनमाफियांवर मोका

By Admin | Updated: June 2, 2015 02:00 IST2015-06-02T02:00:33+5:302015-06-02T02:00:33+5:30

नाशिकमधील रेशनिंग धान्य अपहार प्रकरणात ५ रेशनमाफियांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगार प्रतिबंधक कायदा (मोका) अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील

Five Rhanamapani Moka in Nashik Grain Tactics | नाशिक धान्य घोटाळ्यात ५ रेशनमाफियांवर मोका

नाशिक धान्य घोटाळ्यात ५ रेशनमाफियांवर मोका

पुणे : नाशिकमधील रेशनिंग धान्य अपहार प्रकरणात ५ रेशनमाफियांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगार प्रतिबंधक कायदा (मोका) अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. अन्नधान्य वितरण विभागात राज्यात प्रथमच मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
नागरी पुरवठा आयुक्त कार्यालयाच्या सहायक संचालकांनी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील धान्य गोदामांची तपासणी केली असता तब्बल ३० हजार क्विंटल धान्याची अफरातफर झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर अशाच प्रकारे सिन्नर येथेदेखील रेशनिंगच्या तांदळाच्या २८० गोण्या परस्पर खासगी राइस मिलमध्ये पाठवून घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले. संबंधित प्रकरणात विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ७ तहसीलदारांसह सुमारे १७ जणांना निलंबित केले. त्यानंतर या प्रकरणाची जिल्हा पोलीस उप-अधीक्षकांमार्फत सखोल चौकशी करण्यात आली. त्यात रेशनमाफियांची संघटित टोळी असल्याचे निदर्शनास आले, असे बापट यांनी सांगितले.
रेशनमाफिया टोळीचा म्होरक्या संपत घोरपडे (५०), विश्वास घोरपडे (४६), अरुण घोरपडे (४४), मगन उर्फ मदन पवार (४३) आणि रमेश पाटणकर (४५) यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली.
हे सर्व जण वाहतूकदार आणि ठेकेदार आहेत.

Web Title: Five Rhanamapani Moka in Nashik Grain Tactics