शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पाच देहांचा कोळसा करू कुणाच्या हवाली?

By admin | Updated: May 24, 2014 01:11 IST

सुन्न पडलेल्या निशांत प्रकाश सिरियाच्या आक्रोशातील हा भाव सार्‍यांचाच थरकाप उडविणारा आहे. गुरुवारी मध्यरात्री त्याने आई, पत्नी, मुलगा, बहीण आणि भाची असा अवघा परिवारच गमावला, तोही अत्यंत भयावहरीत्या!

आक्रोशातील भाव : सार्‍यांचाच थरकाप उडविणारा

नरेश डोंगरे - नागपूर

सुन्न पडलेल्या निशांत प्रकाश सिरियाच्या आक्रोशातील हा भाव सार्‍यांचाच थरकाप उडविणारा आहे. गुरुवारी मध्यरात्री त्याने आई, पत्नी, मुलगा, बहीण आणि भाची असा अवघा परिवारच गमावला, तोही अत्यंत भयावहरीत्या! गोकुळपेठेतील अजिंक्य प्लाझा या चार माळ्यांच्या इमारतीत राहणारा निशांत (वय ३१) संगणकाचे काम करतो. त्याची आई सलीला (वय ६०) भारतीय विद्या भवनमधून वर्षभरापूर्वी निवृत्त झाल्या होत्या. मनमिळावू आई, समंजस पत्नी रागिणी (वय ३१) घरात सर्वांचाच जीव की प्राण असलेला चिमुकला निरांश (वय अडीच वर्षे) असा मोजका आणि नजर लागण्यासारखा परिवार. बहीण श्रुती श्रीकांत माळी (वय २५) प्रतापनगरात राहायची. तिला दोन वर्षांची मुलगी (सहना) होती. श्रुतीचे पती श्रीकांत एमआर आहेत. पती दौर्‍यावर गेले की श्रुती चिमुकलीला घेऊन माहेरी यायची. आई, पत्नी, बहीण, गोड मुलगा अन् तेवढीच गोंडस भाची घरात असले की गोकुळच भरल्यासारखे वाटायचे. श्रीकांत बाहेर गेल्यामुळे श्रुती नेहमीप्रमाणे आपल्या चिमुकलीला घेऊन माहेरी आली होती. गुरुवारी रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर टीव्हीवरील सिरियल अन् निरांश तसेच सहनाचे लाडकोड करीत हे कुटुंब झोपले. ते बेसावध झाल्याची काळाला खात्री पटली असावी. म्हणूनच की काय त्याने आपला डाव फेकला. चौकीदार लेखराज रतिराम परते जोरजोरात ओरडू लागला. ‘निचे आग लगी... निचे आग लगी...’ मध्यरात्री सुमारे दीड वाजता ही आरडाओरड ऐकून निशांत, सलीला, रागिणी आणि श्रुती जागे झाले. अर्धवट झोपेतील या सर्वांना काय करावे त्याचेही भान नव्हते. खाली आग लागली हे कळल्यानंतर खाली कशाला जायचे, असा साधा प्रश्नही त्यांना पडला नाही. त्यात ते सर्व पहिल्याच माळ्यावर होते. मात्र, मृत्यूने जाळे टाकले होते. त्यात त्यांना अडकायचे होते. ते सर्व अलगद अडकलेच. वृध्द सलीला तसेच रागिणी आणि श्रुती आपापल्या चिमुकल्यांना खांद्यावर घेत सरळ लिफ्टमध्ये शिरल्या. लिफ्ट खाली आली. स्वयंचलित दार उघडले गेले अन् तिघींच्याही किंकाळ्यांनी ‘अजिंक्य प्लाझा’चा परिसर हादरला. येथे ओशाळला मृत्यू रागिणी आणि श्रुतीच्या खांद्यावर निद्रिस्त अवस्थेतील त्यांची चिमुकली होती. त्यांना काही कळायचा प्रश्नच नव्हता. आगीच्या वणव्यात सापडलेल्या सलीला, रागिणी आणि श्रुती जीवाच्या आकांताने ओरडत होत्या. निरागस निरांश आणि सहना ओरडले की नाही, ते काळालाच कळले असेल. तिकडे आग लागल्यामुळे आपल्यासोबत राहणार्‍यांना काही होऊ नये म्हणून निशांत प्रत्येकाचे दार ठोठावून त्यांना माहिती देऊ लागला. त्यांना काही होऊ नये, यासाठी त्याची ही धडपड होती. आई, पत्नी, बहीण, मुलगा, भाची सर्व खाली गेले, याचे भान येताच तो भरभर पायर्‍या उतरून खाली आला. काळाचे भयावह रूप, त्याने गिळंकृत केलेला त्याचा परिवार अन् ते एकूणच दृश्य हतबल निशांतला अंतर्बाह्य कोलमडून टाकणारे ठरले. तो काहीच करू शकत नव्हता. केवळ अन् केवळ ओरडत होता. तेव्हापासूनचे त्याचे आक्रंदन आताही सुरूच आहे. या घटनेची माहिती कळाल्यानंतर श्रीकांतची झालेली अवस्थाही याहून वेगळी नाही.