शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

बँकॉकमध्ये नागपूरला पहिल्यांदाच प्रतिनिधित्व

By admin | Updated: August 29, 2014 00:57 IST

बँकॉकमध्ये ‘एक्स्प्रेस मेल सर्व्हिस’वर आयोजित कार्यशाळेत पहिल्यांदाच नागपुरातून प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. बँकॉकमध्ये १ ते १४ सप्टेंबरपर्यंत आयोजित या कार्यक्रमात आशिया खंडातील

डाकसेवा प्रणालीवर प्रेझेन्टेशन : उपव्यवस्थापक दिलीप खाडे सहभागी होणार नागपूर : बँकॉकमध्ये ‘एक्स्प्रेस मेल सर्व्हिस’वर आयोजित कार्यशाळेत पहिल्यांदाच नागपुरातून प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. बँकॉकमध्ये १ ते १४ सप्टेंबरपर्यंत आयोजित या कार्यक्रमात आशिया खंडातील देशांमधील डाकसेवा प्रणाली आणि आधुनिक तंत्रज्ञान वापराबाबत माहितीचे आदान-प्रदान केले जाणार आहे. यासाठी भारतातून डाक विभागातील तीन कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यात तामिळनाडूतून एक महिला कर्मचारी आणि केरळ व नागपूरच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एशियन पॅसिफिक पोस्टल सेंटरच्या बँकॉक येथील मुख्यालयात यापूर्वीसुद्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. परंतु विदर्भातील कुठल्याही प्रतिनिधीला आजवर त्या कार्यक्रमात सहभागी होता आलेले नाही. एशियन पॅसिफिक पोस्टल सेंटरची स्थापना १९७० मध्ये झाली. संघटनेतर्फे आयोजित कार्यशाळेत आशिया खंडातील राष्ट्रांना आमंत्रित केले जाते. प्रशिक्षणादरम्यान प्रतिनिधींना डाकसेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहिती दिली जाते, सोबतच प्रतिनिधींच्या सूचनांनाही सामील केले जाते. नागपुरातील नॅशनल स्पीड पोस्ट कार्यालयाचे उपव्यवस्थापक दिलीप खाडे यांची बँकॉकला जाण्यासाठी निवड करण्यात आली आहे. ते ३० आॅगस्ट रोजी बँकॉकसाठी रवाना होणार आहेत. डाकसेवासंबंधी ते आपले प्रेझेन्टेशनसुद्धा सादर करतील. (प्रतिनिधी)