शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरचा अभयसिंह राज्यात प्रथम

By admin | Updated: April 6, 2015 03:25 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परिक्षेचा रविवारी आॅनलाईन जाहीर झाला असून, सोलापूर जिल्ह्णातील मंगळवेढ्याचा

पुणे/मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परिक्षेचा रविवारी आॅनलाईन जाहीर झाला असून, सोलापूर जिल्ह्णातील मंगळवेढ्याचा अभयसिंह मोहिते हा ४७० गुण मिळवत राज्यात प्रथम आला आहे. मागासवर्गीयांतून पुण्याचा विशाल साकोरे ४६३ मिळवून तर मुलींमधून नांदेडची वनश्री लाभशेटवार ही ४२५ गुण घेवून राज्यात पहिली आली आहे. राज्यातील ४३८ उमेदवारांची विविध सेवापदांसाठी निवड करण्यात आली आहे.राज्य सेवेची मुख्य परीक्षा २ फेब्रुवारी २०१४ रोजी घेण्यात आली. यामध्ये उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, सहाय्यक विक्रीकर आयुक्त, उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी, सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, कक्ष अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी या पदांचा समावेश आहे. राजेंद्र कचरे हा अल्पदृष्टी वर्गवारीत राज्यात पहिला आला आहे. राज्यभरातून उपजिल्हाधिकारी पदासाठी ४४ उमेदवार पात्र ठरले आहेत. पोलीस उपअधीक्षक पदासाठी २४, तहसीलदार पदासाठी ३५, विक्रीकर सहआयुक्त पदासाठी ६, गटविकास अधिकारी पदासाठी ९, सहाय्यक संचालक (वित्त व लेखा विभाग) ७, नायब तहसीलदार पदासाठी २२७ उमेदवार पात्र ठरले आहेत. निकालासाठी आवश्यक कट आॅफ गुण संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. अभयसिंह मोहिते हा अभियांत्रिकीचा पदवीधर, तर वनश्री लाभशेटवार ही वैद्यकीय पदवीधर आहे़ १ लाख ७६ हजार २२४ विद्यार्थ्यांनी ही राज्यसेवा पूर्व परीक्षा दिली होती. पैकी ६३९५ परीक्षार्थी मुख्य परीक्षेस पात्र ठरले होते़ त्यातून १३३७ उमेदवारांना मुलाखतीसाठी निवडण्यात आले होते. यापैकी ४३८ उमेदवारांची विविध पदांकरिता निवड करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)