पंतप्रधान म्हणून मोदींचे प्रथम छायाचित्र मुंबईत

By Admin | Updated: May 27, 2014 05:40 IST2014-05-27T05:40:35+5:302014-05-27T05:40:35+5:30

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे सर्वात प्रथम छायाचित्र मुंबईत लागले

The first photograph of Modi as the Prime Minister in Mumbai | पंतप्रधान म्हणून मोदींचे प्रथम छायाचित्र मुंबईत

पंतप्रधान म्हणून मोदींचे प्रथम छायाचित्र मुंबईत

मुंबई : पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे सर्वात प्रथम छायाचित्र मुंबईत लागले. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनमध्ये शपथविधी घेताना मोदी जेव्हा बोलले की, ‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी, प्रधानमंत्रीपद की शपथ लेता हूं,’ तेव्हाच मुंबईतील ऐतिहासिक आॅगस्ट क्र ांती मैदानाजवळच्या पालिकेच्या डी वॉर्ड कार्यालयात त्यांचे सर्वात पहिल्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले. मलबार हिलचे आ. मंगल प्रभात लोढा यांच्यातर्फे आयोजित या कार्यक्र मामध्ये अनेक कार्यकर्ते सहभाग होते. च्शहीद गौरव समितीचे संयोजक वसंतराव बेडेकर, प्रभाग समितीच्या अध्यक्ष ज्योत्स्नाबेन मेहता, लोढा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजू लोढा, नगरसेविका सरिता पाटील, मलबार हिल भाजपाचे अध्यक्ष सतीश देसाई यांच्या हस्ते मोदींचे पंतप्रधान म्हणून देशाचे या सर्वात प्रथम छायाचित्रांचे अनावरण करण्यात आले. या विशेष कार्यक्र मांमध्ये समाजसेवक, डॉक्टर, उद्योगपती, व्यावसायिक, सीए, वकील, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांतील अनेक मान्यवरांबरोबर हजारो जण उपस्थित होते. या समारंभात राष्ट्रपती भवनात मोदीजींच्या शपथविधीच्या कार्यक्र माच्या थेट प्रसारणाची विशेष व्यवस्था मोठ्या एलसीडी स्क्र ीनवर करण्यात आली होती.

Web Title: The first photograph of Modi as the Prime Minister in Mumbai