शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आरे कॉलनीत पहिले गोकूळग्राम

By admin | Updated: March 18, 2015 01:33 IST

गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे अतिरिक्त ठरणाऱ्या गोवंशाच्या देखभालीसाठी राज्यात चार ठिकाणी गोकूळग्राम प्रकल्प उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

मुंबई : गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे अतिरिक्त ठरणाऱ्या गोवंशाच्या देखभालीसाठी राज्यात चार ठिकाणी गोकूळग्राम प्रकल्प उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यासाठी लागणारा ९० कोटींचा निधी केंद्र सरकार देणार असल्याची माहिती पशू व दुग्धसंवर्धन मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत दिली. पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. राज्यातील चार गोकूळग्रामना केंद्र सरकारने मान्यता दिली असून, मुंबईत आरे कॉलनीत १६ कोटी ९३ लाख, अमरावती येथे १७ कोटी ९० लाख, पुण्यातील ताथवडे येथे ३२ कोटी ३८ लाख तसेच पालघर येथील दापचेरी अशा चार ठिकाणी गोकूळग्राम योजना राबविण्यात येणार आहे. याशिवाय राज्यात अन्यत्र हजार गार्इंमागे एक गोकूळग्राम उभारण्यात येणार आहे. या गोकूळग्राम चालविणाऱ्या संस्थांना नाममात्र दरात गायरान जमिनी देण्यात येतील. तसेच सामाजिक वनीकरण, वने आदीतील कुरणे गोवंशाच्या चरणासाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. शिवाय जैन धार्मिक संस्था, अहिंसावादी संघटनांसह स्वयंसेवी संस्थांनीही आर्थिक मदतीसह गोवंशाच्या रक्षणासाठी पुढाकाराची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती खडसे यांनी दिली. (प्रतिनिधी)महाराष्ट्राला केंद्राची सापत्न वागणूक केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार शेजारच्या देशांना अब्जावधीची मदत करते; मात्र राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करायला तयार नाही, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेतील पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान केला. अलीकडेच मॉरिशसला ३२ अब्जची मदत करण्यात आली. श्रीलंका आणि अन्य छोट्या देशांनाही सढळ हाताने मदत करताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही. राज्याने मदतीसाठी दोनवेळा पाठविलेले प्रस्ताव केंद्राने फेटाळले. अन्य राज्याचे मंत्री, अधिकारी दिल्लीतून मदत मिळवित असताना राज्य सरकार मात्र त्यात अपयशी ठरत आहे. मागील आठ दिवसांत गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचीही माहिती देऊन शेतकऱ्यांना मदत देताना प्रक्रियेत न अडकता तातडीने त्यांना मदत करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.