शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

लोकलचा फर्स्ट क्लास प्रवास आजपासून महाग

By admin | Updated: June 1, 2015 04:58 IST

रेल्वे भाडेवाढ होणार की नाही याकडे प्रवाशांचे लक्ष लागले असतानाच कुठलीही भाडेवाढ होणार नसल्याचे रेल्वे अर्थसंकल्पातून जाहीर केले आणि प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न

मुंबई : रेल्वे भाडेवाढ होणार की नाही याकडे प्रवाशांचे लक्ष लागले असतानाच कुठलीही भाडेवाढ होणार नसल्याचे रेल्वे अर्थसंकल्पातून जाहीर केले आणि प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न रेल्वे मंत्र्यांकडून करण्यात आला. मात्र सर्वसाधारण अर्थसंकल्पात सेवा कर वाढवण्याची शिफारस करण्यात आल्याने रेल्वे प्रवास महाग होणार आहे. १ जूनपासून वाढीव सेवा कर लागू होत असून, एक्स्प्रेस गाड्यांच्या एसी फर्स्ट क्लास प्रवासाबरोबरच मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलचा फर्स्ट क्लास प्रवासही महाग होणारआहे. एसी आणि फर्स्ट क्लासच्या प्रवासात अर्ध्या टक्क्याने वाढ होणार आहे.भाजपाची केंद्रात एकहाती सत्ता येताच ‘अच्छे दिन आएंगे’ असे सांगत अनेक स्वप्ने दाखवण्यात आली. पण सत्ता येताच पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पात दुप्पट भाडेवाढ करण्यात आली आणि त्याचा मुंबईकरांना मोठा फटका बसला. पास आणि तिकीट शुल्कात वाढ झाल्याने त्याला उपनगरीय लोकल प्रवाशांनी विरोध केला. त्यामुळे मोठी भाडेवाढ मागे घेऊन अल्प भाडेवाढच लागू केली. रेल्वे मोठ्या आर्थिक संकटातून जात असल्याने नुकत्याच सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पातही भाडेवाढ होईल, अशी शक्यता होती. मात्र भाडेवाढ होणार नसल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसरीकडे केंद्रीय अर्थसंकल्पात सेवा कर वाढविण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांना त्याचा फटका बसला. लोकलच्या फर्स्ट क्लास पासावर आणि एसी तिकिटावर सध्या सेवा कर हा १२.३६ टक्के असून, त्यामध्ये ७० टक्के सूट देण्यात येते आणि तो कर ३.७ एवढा आकारला जात होता. आता हाच कर १ जूनपासून जवळपास १४ टक्के एवढा होणार असून, त्यामध्ये नेहमीप्रमाणे ७० टक्के सूट दिल्यानंतर ४.२ टक्के एवढा होईल. यामुळे उपनगरीय लोकलचा फर्स्ट क्लासचा पास तसेच तिकीट आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांमधील एसी फर्स्ट, एक्झिक्युटिव्ह क्लास, सेकंड आणि थर्ड एसी, एसी चेयर कार, एसी इकॉनॉमी क्लासची तिकिटे महागणार आहेत. (प्रतिनिधी)