शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पोलिसांचे मेडल आले

By admin | Updated: May 31, 2014 01:00 IST

उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस दलातील अधिकारी, कर्मचार्‍यांना दोन वर्षांंंपूर्वी घोषित झालेले राष्ट्रपती पोलीस पदक अखेर राज्य पोलीस दलाकडे आले. हे पदकं समारंभपूर्वक प्रदान करण्यासाठी सरकारला

अच्छा दिन आनेवाला है : मुहूर्तही सापडलानरेश डोंगरे - नागपूरउल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस दलातील अधिकारी, कर्मचार्‍यांना दोन वर्षांंंपूर्वी घोषित झालेले  राष्ट्रपती पोलीस पदक अखेर राज्य पोलीस दलाकडे आले. हे पदकं समारंभपूर्वक प्रदान  करण्यासाठी सरकारला मुहूर्तही मिळाला. त्यामुळे तब्बल दोन वर्षे प्रतीक्षा केल्यानंतर आता ६  जूनला मा. राज्यपालांच्या हस्ते ‘त्या‘ गुणवंत पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना ‘सेवेचे चीज‘  मिळणार आहे. कर्तव्य बजावताना अनेकदा पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांच्या वाट्याला मनस्ताप येतो. कित्येकदा  त्याची नोकरी डावावर लागते अन् अनेकदा हा पोलीसदादा आपल्या जीवाचीही बाजी लावून  कर्तव्य पार पाडतो. हे करणार्‍या अनेकांपैकी मोजक्या अधिकारी, कर्मचार्‍यांना त्यांच्या  उल्लेखनीय, गुणवत्तापूर्ण सेवेची पावती मिळते. त्यांना पोलीस पदक, महासंचालकांचे सन्मानचिन्ह,  राष्ट्रपती पदक जाहीर होते. मात्र, जाहीर झालेले पदक दोन-अडीच वर्षे वाट पाहूनही वर्दीवर लागत  नाहीत. शिस्तीचे दल असल्यामुळे पदक मिळण्यास का विलंब होतो, ते विचारण्याचीही सोय नसते.  पदकाच्या प्रतीक्षेत अनेक जण नवृत्तही होतात.  उल्लेखनीय तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्य पोलीस दलातील पाच वरिष्ठ अधिकार्‍यांसह एकूण  ४३ अधिकारी,  कर्मचार्‍यांना १५ ऑगस्ट २0१२ च्या पुर्वसंध्येला अनुक्रमे राष्ट्रपती पोलीस पदक  आणि पोलीस पदक जाहिर झाले. त्यात अतिरिक्त पोलीस महासंचालक आर. एन. वाघ, अतिरिक्त  महासंचालक गुलाबराव पोळ, अतिरिक्त महासंचालक हिमांशू रॉय दासोदी(एडीजी, एटीएस),  प्रभात कुमार (सीपी रेल्वे) आणि शारदा पी यादव (एडीजी, सीआयडी) यांच्यासह विदर्भातील  नारायण विठोबाजी कुरसंगे (एएसआय, वर्धा) आणि शालिकराम गणपतराव डांगे (एएसआय  चंद्रपूर) या  अधिकार्‍यांचाही समावेश आहे. तत्पूर्वी, २६ जानेवारी २0१२ च्या पूर्वसंध्येला एसीपी  नम्रता नितीन अलकुनरे यांनाही पोलीस पदक जाहीर झाले. त्यानंतर २६ जानेवारी आणि १५  ऑगस्ट २0१३ ला तसेच २६ जानेवारी २0१४ च्या पूर्वसंध्येला पुन्हा अशाच पद्धतीने राज्यातील  दोनशेवर गुणवंत पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना उपरोक्त पदके जाहीर झाली.  मात्र, प्रदीर्घ  कालावधी होऊनही ही पदके त्यांना मिळाली नव्हती. केंद्रांकडून आली नाही, असे मोघम उत्तर  मिळत होते. अखेर २0१२ ला जाहीर झालेल्या ४४ अधिकारी, कर्मचार्‍यांची पदके पोलीस  महासंचालनालयाला मिळाली.  ६ जूनला दुपारी ४.३0 वाजता मुंबईतील राजभवनाच्या दरबार  हॉलमध्ये मा. राज्यपालांच्या हस्ते संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांना ती सन्मानपूर्वक प्रदान केली  जाणार आहे. त्यासाठी २८ मे रोजी एक विशेष पत्र पाठवून या सर्वांंंना २ जूनला मुंबईत  बोलविण्यात आले आहे. ३ आणि ४ जूनला या कार्यक्रमाची रंगीत तालिम होणार आहे. सातजण नवृत्त पदकाची आस लावून बसलेल्यांपैकी सातजण नवृत्त झाले. त्यात अतिरिक्त महासंचालक आर. एन  वाघ, अतिरिक्त पोलीस महासंचालक गुलाबराव पोळ (स्वेच्छानवृत्ती घेतली), एसीपी महादेव  अद्रशप्पा गुंडेवाडी, एएसपी रॉल्फी पॅट्रिक परेरा, एएसपी माणिक शिवराम पेरके, एएसपी चंद्रकांत  नामदेव दिलपाक आणि एएसआय अनंत अंकूश दळवी यांचा समावेश आहे.