शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

...तरीही लढत पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच

By admin | Updated: October 9, 2014 04:29 IST

आतापर्यंत युती विरूद्ध आघाडी अशीच लढत झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पाच मतदार संघात आता चारही पक्ष आमने-आमने आले आहेत

आतापर्यंत युती विरूद्ध आघाडी अशीच लढत झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पाच मतदार संघात आता चारही पक्ष आमने-आमने आले आहेत. तरीही चार मतदार संघातील प्रमुख लढत पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होईल तर रत्नागिरी विधानसभा मतदार संघात मात्र शिवसेना विरूद्ध भाजप अशीच प्रमुख लढत होणार आहे. आघाडी सरकारमध्ये नऊ खात्यांचे राज्यमंत्रीपद भुषवलेल्या उदय सामंत यांचा शिवसेना प्रवेश ही जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेची गोष्ट झाली आहे.काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात १९९0 साली शिवसेना-भाजप युतीने आणि २00४पासून राष्ट्रवादीने शिरकाव केला. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या जिल्ह्यात राष्ट्रवादीनेही चांगले स्थान निर्माण केले आहे.आताच्या निवडणुकीत दापोली, चिपळूण या मतदार संघात राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना, राजापूर मतदार संघात शिवसेना विरूद्ध काँग्रेस, गुहागर मतदार संघात राष्ट्रवादी विरूद्ध भाजप तर रत्नागिरी मतदार संघात भाजप विरूद्ध शिवसेना अशी प्रमुख लढत होणार आहे.दापोलीत पाचवेळा आमदार झालेल्या शिवसेनेच्या सूर्यकांत दळवी यांना सहाव्यांदा आमदार होण्यासाठी राष्ट्रवादीच्या संजय कदम यांच्याशी टक्कर द्यावी लागणार आहे. राष्ट्रवादीच्या किशोर देसाई यांच्या बंडखोरीमुळे दळवी यांचा मार्ग काहीसा सोपा होणार आहे. गुहागर मतदार संघात राष्ट्रवादीचे मावळते कामगार मंत्री भास्कर जाधव यांना तुटलेल्या युतीचा पुन्हा एकदा फायदा होण्याची शक्यता आहे. भाजपचे डॉ. विनय नातू यांनी गेल्या काही काळात शिवसेनेशी केलेली जुळवणी आणि मतदारांची केलेली आळवणी युती तुटल्यामुळे फारशी उपयोगात येणार नाही, असे दिसत आहे. चिपळूण मतदार संघात शिवसेनेचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांना राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांच्याकडून जोरदार टक्कर दिली जाण्याची अपेक्षा आहे. राजापूर मतदार संघात शिवसेनेचे राजन साळवी आणि काँग्रेसचे राजन देसाई अशी पारंपरिक पक्षीय लढत होणार आहे. त्यात शिवसेनेचे पारडे काहीसे जड आहे. सर्वात उत्सुकता आहे ती रत्नागिरी मतदार संघात. राष्ट्रवादीचे उदय सामंत शिवसेनेत गेल्यामुळे ते आणि भाजपचे बाळ माने सलग तिसऱ्यांदा समोरासमोर येत आहेत. दोनवेळा आमदार झालेल्या सामंत यांना पक्षांतरामुळे त्यांना तिसरा विजय सोपा नाही. भाजपची बहुतांश भिस्त प्रचाराच्या शेवटच्या दिवशी होणाऱ्या मोदी यांच्या सभेवर आहे. म्हणूनच ही जागा अधिक चुरशीची होणार आहे. (प्रतिनिधी)