शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हा दाखल, पण सुटकेचा मार्गही केलाय मोकळा !

By admin | Updated: February 4, 2015 02:24 IST

ओल्या पार्टीप्रकरणी पोलिसांनी केवळ सार्वजनिक शांततेच्या भंगाचा व रात्री उशिरापर्यंत वाद्य वाजविल्याबाबत गुन्हा दाखल केल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

नाशिक : थेट संरक्षण विभागाच्या अखत्यारितील विमानतळावरच सेवानिवृत्त बांधकाम अभियंत्याच्या निरोपाच्या ओल्या पार्टीप्रकरणी पोलिसांनी केवळ सार्वजनिक शांततेच्या भंगाचा व रात्री उशिरापर्यंत वाद्य वाजविल्याबाबत गुन्हा दाखल केल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. संबंधितांवर काहीच कारवाई करण्यात न आल्याने यामागे एका मोठ्या नेत्याचे नाव आता दबक्या आवाजात घेतले जात आहे.दिंडोरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजेंद्र केदारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हर्ष कन्स्ट्रक्शनचे मालक विलास केदू बिरारी, बिल्डर्स असोशिएशन आॅफ नाशिक शाखेचे सर्व पदाधिकारी, सुनील ढगे तसेच डिंगोरे मंडप डेकोरेटर्स या सर्वांविरोधात ३१ जानेवारीच्या रात्री नऊ वाजेपासून ते रात्री दीड वाजेपर्यंत बेकायदा विनापरवाना सार्वजनिक मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करून रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी उपअधीक्षक गुंजाळ यांच्याकडून सविस्तर अहवाल मागविला होता. त्यानुसारच गुन्हा दाखल झाला काय? अहवालात नेमके काय होते? असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी या प्रकरणी सविस्तर अहवाल मागवून बहुचर्चित पार्टीत सहभागी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सचिवांकडे केली आहे. (प्रतिनिधी)मद्यपानाच्या पार्टीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील जागा कशी देता येते असा सवाल उपस्थित होताच, घाईगर्दीने ठेकेदार विलास बिरारी यांनी दहा हजार रुपये भाड्यापोटी भरले.