शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांचं नव्हे, तर जनरल डायरचं सरकार; सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 20:30 IST

आंदोलन करणाऱ्या कर्णबधीरांवर लाठीमार झाल्यानंतर सुळे आक्रमक

पुणे : कर्णबधीरांचं आंदोलन सुरू असताना त्यांच्यावर लाठीमार झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. या सरकारची लाज वाटते. हे फडणवीसांचं नव्हे, तर जनरल डायरचं सरकार असल्याची घणाघाती टीका असल्याचं सुळेंनी म्हटलं. कर्णबधीर विद्यार्थी इकडे उपाशी पोटी आंदोलन करत आहेत आणि तिकडे वर्षा बंगल्यावर स्नेहभोजनाचा कार्यक्रम  सुरु आहे. या सरकारची लाज वाटते, अशा शब्दांमध्ये सुळेंनी संताप व्यक्त केला. आपल्या विविध मागण्यांसाठी समाजकल्याण कार्यालयावर मोर्चा घेऊन आलेल्या कर्णबधीर विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. संध्याकाळी उशिरापर्यंत या विद्यार्थ्यांनी येथे ठिय्या मांडला होता. संध्याकाळी खासदार सुप्रिया सुळे यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेतली. मी तुमच्या पाठीशी आहे, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. आंदोलक विद्यार्थ्यांना काहीतरी खाऊन घेण्याची तसंच पाणी पिण्याची विनंतीदेखील त्यांनी केली. 'भाजप सरकार चोवीस तास निवडणुकीच्या मोडमध्ये असतं. मुख्यमंत्री राज्यात हेलिकॉप्टरनं फिरत असतात. परंतु एकाही मंत्र्याला त्यांना इकडे पाठवता येत नाही. या सरकारची लाज वाटते. आज जर या आंदोलनावर तोडगा निघाला नाही, तर मी उद्या स्वतः या मुलांसोबत आंदोलनाला बसेन. ज्या पोलिसांनी या मुलांवर लाठीचार्ज केला आहे, त्या अधिकाऱ्यांची पारदर्शक चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करायला हवी, अन्यथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा,' अशी मागणी सुळेंनी केला.सुळे यांनी फोनवरून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तसेच त्यांनी धनंजय मुंढे यांना फोन करून अधिवेशनात या विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडण्याची विनंती केली.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाRajkumar Badoleराजकुमार बडोले