शहरं
Join us  
Trending Stories
1
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
2
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
3
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
4
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
6
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
7
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
8
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
9
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
10
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
11
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
12
Latest Marathi News LIVE Updates: महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा
13
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
14
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
15
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
16
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
17
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
18
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
19
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
20
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वसईच्या उमंग फार्माटेकवर एफडीएचा छापा

By admin | Updated: September 13, 2014 02:51 IST

‘उमंग फार्माटेक प्रायव्हेट लिमिटेड’ या वसई तालुक्यातील पेल्हार गावातील कंपनीने परवान्याची मुदत संपली असताना औषधनिर्मिती, विक्री व निर्यात केल्याचा ‘लोकमत’ने भंडाफोड केला

मुंबई : ‘उमंग फार्माटेक प्रायव्हेट लिमिटेड’ या वसई तालुक्यातील पेल्हार गावातील कंपनीने परवान्याची मुदत संपली असताना औषधनिर्मिती, विक्री व निर्यात केल्याचा ‘लोकमत’ने भंडाफोड केला. या प्रकरणी सहायक आयुक्त गिरीश हुकरे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएने ‘उमंग फार्माटेक’वर नुकताच छापा मारला. मुंबईतील जवाहरलाल पोर्ट ट्रस्ट बंदरातून ही निर्यात झाल्याने केंद्रीय मानक नियंत्रण संघटनेच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह लागले आहे.या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’च्या दि. १२ सप्टेंबरच्या अंकात छापून आले आहे.या कंपनीकडे वेगवेगळ्या औषधनिर्मितीचे १३४ परवाने असून, त्यांची मुदत २०१६पर्यंतची आहे. या प्रकरणी एफडीएने कारवाई सुरू केली असली तरी, हे प्रकरण आयात - निर्यातीशीसुद्धा निगडित असल्याने औषधांच्या आयात-निर्यातीवर नियंत्रण ठेवणाऱ्या केंद्रीय मानक नियंत्रण संघटना (सीडीएससीओ)ने कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप सहायक आयुक्त वखारीया यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.लाखो डॉलरचे सौदे...‘डीएचए पॅलेट’ या रसायनाच्या परवान्यावर २० मार्च २०१४ रोजी वखारिया यांनी स्वाक्षरी केली आहे. मात्र हे रसायन १० मार्च २०१४ रोजी कॅनडा या देशातील विवा फार्मास्युटिकल या कंपनीला दीड लाख अमेरिकन डॉलरमध्ये विकण्यात आले. एफडीएचे स्पष्टीकरणजुलै महिन्यात आम्ही तेथे आॅडिट केले होते. मात्र ती सर्वसाधारण भेट असल्याने सखोल चौकशी केली नाही. लोकमतने दिलेल्या माहितीमुळे सदर कंपनीविरोधात चौकशी व कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. योग्य परवाना नसताना एखाद्या औषधाचे उत्पादन अथवा विक्री करणाऱ्या किंवा परवाना मिळण्याआधीच जर उत्पादन व विक्री केली असल्यास अशा कंपनीचा परवाना रद्द होऊन फौजदारी खटला दाखल होऊ शकतो, असे ‘उमंग फार्माटेक’च्या बाबतीत अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त गि. खु. वखारिया यांनी स्पष्ट केली.