दिव्यात थांबणार फास्ट लोकल!

By Admin | Updated: March 13, 2015 05:37 IST2015-03-13T05:37:34+5:302015-03-13T05:37:34+5:30

तांत्रिक कारणास्तव धीम्या लोकल गाड्या उशिराने धावत असल्याच्या कारणामुळे दिवा स्थानकात प्रवाशांचा उद्रेक झाला आणि त्यामुळे जलद लोकल

Fast locals to stop in the lights | दिव्यात थांबणार फास्ट लोकल!

दिव्यात थांबणार फास्ट लोकल!

मुंबई : तांत्रिक कारणास्तव धीम्या लोकल गाड्या उशिराने धावत असल्याच्या कारणामुळे दिवा स्थानकात प्रवाशांचा उद्रेक झाला आणि त्यामुळे जलद लोकल गाड्यांनाही दिवा स्थानकात थांबा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. दिवावासीयांची होणारी गैयसोय पाहता जलद लोकल गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्याचा निर्णय झाला असून, त्यासाठी नवीन लाइन टाकण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. या नवीन लाइनवरून डाऊन धीम्या लोकल चालवून जलद लोकलच्या थांब्यासाठी मार्ग मोकळा केला जाणार आहे. या कामासाठी वर्षभराचा कालावधी लागणार आहे. जानेवारीत ठाकुर्ली स्थानकाजवळ एका लोकलच्या पेन्टोग्राफमध्ये बिघाड झाला आणि त्याचा परिणाम अप आणि डाऊन धीम्या लोकल सेवेवर झाला. धीम्या लोकलच्या खोळंब्यामुळे प्रवाशांनी तोडफोड केली होती. आता दिवा स्थानकात जलद लोकल गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यासाठी दिवा स्थानकात धीम्या लोकलसाठी एक नवीन लाइन टाकून सर्व लाइन स्थलांतरित केल्या जातील, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. या नवीन लाइनवरून डाऊन धीमी लोकल धावेल आणि मग सध्याच्या डाऊन धीम्या लाइनवरून अप धीमी लोकल जाईल. तर त्यानंतर रिकामी झालेल्या अप धीम्या लाइनवरून डाऊन जलद लोकल चालविण्यात येईल. याच्या बाजूलाच एक प्लॅटफॉर्म असून, त्या ठिकाणी डाऊन जलद लाइन आहे. त्यावरून अप जलद लोकल चालविण्यात येईल. याप्रमाणे लाइन स्थलांतरित करण्याचे काम केले जाईल आणि हे काम पूर्ण झाल्यावरच जलद लोकल गाड्यांना थांबा मिळेल, असे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Fast locals to stop in the lights