शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना आता केवळ पीक विम्याचा आधार

By admin | Updated: October 7, 2014 23:26 IST

पश्‍चिम व-हाडात पीक विम्यापोटी १0 कोटी २६ लाखांची गुंतवणूक.

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (बुलडाणा)अनियमित पावसामुळे होणार्‍या पीक नुकसानाची भरपाई मिळावी, याकरीता पश्‍चिम वर्‍हाडातील ३ लाख ६ हजार ६८१ शेतकर्‍यांनी राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत सुमारे १0 कोटी २६ लाख ७७ हजार रुपयांची पीक विमा गुंतवणूक केली आहे. गत सप्टेंबर महिन्यात पश्‍चिम वर्‍हाडात पावसाचा एक थेंबही न आल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून, ३ लाख ६ हजार ६८१ शेतकर्‍यांना आता पीक विम्याचाच आधार उरला आहे. पश्‍चिम वर्‍हाडातील बुलडाणा, अकोला व वाशिम या तीन जिल्ह्यात यावर्षी सुरूवातीपासून पावसाची अनिश्‍चितता होती. पावसाच्या हुलकावणीमुळे तब्बल एक महिना उशिरा खरीप हंगामाची पेरणी झाली. अनियमित पावसामुळे व उशीरा झालेल्या पेरणीमुळे होणार्‍या पीक नुकसानीची भरपाई मिळावी, याकरीता पश्‍चिम वर्‍हाडातील शेतकर्‍यांनी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत मोठय़ा प्रमाणात सहभाग घेतला. या योजनेचा विमा काढण्याची मुदत सुरूवातीला ३१ जुलैपर्यत होती. ती वाढवून १६ ऑगस्टपर्यंत करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी जास्तीत जास्त शेतकर्‍यांना राष्ट्रीय पीक विमा योजनेत सहभागी होता आले. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकर्‍यांनी यावर्षी पीक विमा काढण्याला प्राधान्य दिले. पश्‍चिम वर्‍हाडातील ३ लाख ६ हजार ६८१ शेतकर्‍यांनी २ लाख ८0 हजार ३२४ हेक्टर क्षेत्रासाठी पीक विमा काढला आहे. त्यासाठी सुमारे १0 कोटी २६ लाख ७७ हजार रुपयांचा पीक विमा हप्ता शेतकर्‍यांनी भरला आहे. यात अकोला जिल्ह्यातील ६७ हजार १४ शेतकर्‍यांनी ७६ हजार ८0२ हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला आहे. त्यासाठी २ कोटी ८७ लाख ३४ हजार रुपये हप्ता शेतकर्‍यांनी भरला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १ लाख ७५ हजार ४१६ शेतकर्‍यांनी १ लाख २९ हजार ७0 हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला आहे. त्यासाठी ५ कोटी १५ लाख ३३ हजार रुपये हप्ता शेतकर्‍यांनी भरला आहे. वाशिम जिल्ह्यातील ६४ हजार २५१ शेतकर्‍यांनी ७४ हजार ४५२ हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला आहे. त्यासाठी २ कोटी २४ लाख १0 हजार रुपये हप्ता शेतकर्‍यांनी भरला आहे. पश्‍चिम वर्‍हाडात गत सप्टेंबर महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामाची पीके सुकून गेली; तर अत्यल्प पावसाने अनेक शेतातील पिके वाळली आहेत. अनियमित पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पीक विमा काढलेले ३ लाख ६ हजार ६८१ शेतकरी आता पीक विम्याचा लाभ मिळेल, या एकमेव आशेवर आहेत.