शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल सहा कोटींची ‘फॅन्सी’ कमाई

By admin | Updated: March 28, 2015 00:05 IST

वास्तुशास्त्रज्ञ, ज्योतिषी यांच्या सांगण्यावरून क्रमांक घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तब्बल सहा कोटींची ‘फॅन्सी’ कमाई

कोल्हापूरकरांचा नादच खुळा : गाडी चाळीस हजारांची, नंबरसाठी पन्नास हजार!कोल्हापूर : कोल्हापूर हे आर्थिकदृष्ट्या संपन्न शहर असले, तरी हौसी लोकांचे शहर म्हणूनही कोल्हापूरची संपूर्ण राज्यात ख्याती आहे. यात कोल्हापूरकरांचे वाहनप्रेम तर सांगायलाच नको. वाहनाबरोबरच त्याचा क्रमांकही ‘फॅन्सी’ हवा. या ‘फॅन्सी’ क्रमांकासाठी वर्षभरात एक, दोन नव्हे, तर तब्बल ६ कोटी २ लाख २२ हजार ७४५ रुपयांचा महसूल ‘आरटीओ’ कोल्हापूरच्या खात्यात जमा झाला आहे. गाडी कोणतीही असो; त्या गाडीला फॅन्सी क्रमांक हा हवाच, अशी मानसिकताच येथील लोकांची झाली आहे. त्यामुळे नवीन गाडी घेतल्यानंतर आपल्याला हवा तसा क्रमांक मिळाला तर बरा; नाहीतर महिनोन्महिने प्रतीक्षा करण्याची व विनाक्रमांक गाडी फिरविण्याची त्यांची सहज तयारी असते. एकाच क्रमांकाला जादा लोकांची पसंती असेल, तर त्याप्रमाणे लिलावाद्वारे तो क्रमांक दिला जातो. १ एप्रिल २०१४ ते २५ मार्च २०१५ या संपूर्ण वर्षात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केवळ फॅन्सी क्रमांकाच्या माध्यमातून ६ कोटी २ लाख २२ हजार ७४५ इतके रुपये आपल्या महसुलात जमा केले आहेत. सध्या क्रमांक एकसाठी चारचाकी वाहनाला किमान एक लाख, तर दुचाकीला २५ हजार रुपये मोजावे लागतात. याशिवाय ९, ९९९, १११, ३३३, ७८६, ४४४, ५५५ या क्रमांकांना ५० हजार रुपये मोजावे लागतात. हा अधिकचा महसूल केवळ फॅन्सी क्रमांकांतून मिळत आहे. यंदा एक, सात आणि नऊ या क्रमांकांना अधिक पसंती आहे. त्याचबरोबर राम, दादा, काका, मामा, राज अशा नावासारख्या क्रमांकांनाही मोठी पसंती आहे. २, ३, ४, ५, ७, ८, १०, ११, २२ या क्रमांकांसाठी चारचाकीला २५ हजार, तर दुचाकीला पाच हजार इतके पैसे वाहनधारकांना मोजावे लागतात. किमान २००० ते १ लाख रुपये इतके केवळ हव्या त्या क्रमांकासाठी मोजणाऱ्या कोल्हापूरकरांच्या हौसेला मोल नाही, हेच खरे. काही दुचाकींची किंमत पन्नास ते पंचावन्न हजार इतकी आहे. मात्र, या दुचाकीला एकच क्रमांक पाहिजे म्हणून वर्षभरात किमान २३ जणांनी गाडीच्याच किमतीएवढे म्हणजे ५० हजार इतके भरले आहेत. वास्तुशास्त्रज्ञ, ज्योतिषी यांच्या सांगण्यावरून क्रमांक घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे.