शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या रोखण्याचे प्रयत्न ठरले निष्फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2016 05:43 IST

मुलगी तणावाखाली असून तिच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत असल्याचे तिच्या डायरीमुळे पालकांना कळले.

मनीषा म्हात्रे,

मुंबई-मुलगी तणावाखाली असून तिच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत असल्याचे तिच्या डायरीमुळे पालकांना कळले. तिच्यावर मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचारही सुरू करण्यात आले, मात्र तणावामागचे कारण समजण्याआधीच मुलीने आयुष्य संपविले. ही घटना मंगळवारी पवई येथे घडली.पवई आयआयटी इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग विभागाचे प्रमुख हेमचंद्र सेशा नंदयाला (४९) आयआयटी कॅम्पसमधील बी बंगलोत मुलगी सरोजा आणि पत्नीसोबत १९ वर्षांपासून राहतात. मंगळवारी रात्री ८च्या सुमारास सरोजा काही न सांगता घराबाहेर पडली. ८.२५ च्या सुमारास तिने शेजारील शिवालिक इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. याबद्दल सुरक्षारक्षकांकडून कुटुंबीयांना कळले. तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. पवई पोलिसांनी सरोजाचा मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला. सुखवस्तू कुटुंबात वाढलेल्या एकुलत्या एक सरोजाने चार महिन्यांपूर्वीच इमारतीवरून उडी मारून आयुष्य संपविण्याची इच्छा ‘पर्सनल डायरीत’ लिहून ठेवली होती. बारावीची परीक्षा सुरू असतानाच तिने असे लिहिले होते. ही डायरी तिच्या वडिलांच्या हाती लागली. त्यांनी तिला मानसोपचारतज्ज्ञांकडे नेले. सरोजा कशामुळे तणावाखाली आहे, याचा शोध लागण्यापूर्वीच नंदयाला कुटुंबीयांवर हा दु:खाचा डोंगर कोसळला. सरोजाला जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घ्यायचा होता.