शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांच्या निर्देशाकडे फडणवीस सरकारचीही डोळेझाक

By admin | Updated: August 24, 2016 20:39 IST

विकास निधी वाटपाबाबत आघाडी सरकारवर राज्यपालांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करीत नसल्याचा ठपका होता

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 24  : विकास निधी वाटपाबाबत आघाडी सरकारवर राज्यपालांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करीत नसल्याचा ठपका होता. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सध्याचे सरकारसुद्धा राज्यपालांनी दिलेल्या निर्देशांकडे डोळेझाक करीत आहे, अशी टीका विदर्भ विकास महामंडळाचे तज्ज्ञ सदस्य अ‍ॅड. मधुकर ऊर्फ मामा किंमतकर यांनी केली.

महामंडळाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्रात ३७१ कलम लागू झाल्यापासून राज्यपाल हे विकास निधीचे वाटप करतात. परंतु त्या निधी वाटपाबाबत राज्यपाल जे निर्देश देतात ते तत्कालीन राज्य सरकार पाळत नाही म्हणून नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि बी.टी. देशमुख यांनी न्यायालयात सरकारविरुद्ध एक याचिका दाखल केली होती. याविरुद्ध तत्कालीन पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी सुद्धा याचिका दाखल केली होती. यात निधी वाटपाचे अधिकार विधिमंडळाला आहे. राज्यपालांना नाही. त्यांनी आदेश दिले तरी ते पाळणे बंधणकारक नाही, असा युक्तिवाद मांडला होता. ६ मे २००८ रोजी न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर आदेश दिले. त्यात न्यायालयाने स्पष्ट म्हटले होते की, राज्यपालांनी निधी वाटपासंदर्भात दिलेले आदेश हे राज्य सरकारला पाळणे बंधणकारक आहे. ती याचिका देवेंद्र फडणवीस जिंकले होते, याची आठवण अ‍ॅड. किंमतकर यांनी करून दिली.

ज्या देवेंद्र फडणवीस यांनी ही याचिका दाखल केली आणि जिंकली तेच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्याच्या सरकारकडून तरी राज्यपालांच्या निर्देशाचे पालन होणे आवश्यक आहे. परंतु तसे होताना दिसत नाही.

अमरावती विभागातील सिंचन विभागातील सर्व रिक्त जागा चार महिन्यात भरा आणि मागील तीन वर्षात विकास निधीचे वाटप ज्या प्रमाणात झाले, त्या प्रमाणात खर्च झाला किवा नाही, याची माहिती जुलै २०१६ पर्यंत सादर करा. त्याची पुस्तिका काढा, असे निदेर्श राज्यपालांनी ११ मार्च २०१६ रोजी सरकारला निर्देश दिले होते. आता पाच महिने होत आहेत. परंतु अमरावती विभागातील सिंचन विभागात अजूनही ३३ टक्के पदे रिक्त आहेत आणि विकास निधी खर्च झाल्याबाबतची माहिती सरकारने अजूनही दिलेली नाही. त्यामुळे हे सरकारही राज्यपालांच्या निर्देशाबाबत उदास्ीान असल्याची टीका अ‍ॅड. किंमतकर यांनी केली आहे.