शहरं
Join us  
Trending Stories
1
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; उपराज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
2
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
3
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
4
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
5
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
6
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
7
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
8
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
9
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
10
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
11
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
12
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
13
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
14
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
15
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
16
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
17
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
18
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
19
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
20
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"

Exclusive: अमित शाह प्रखर राष्ट्रभक्त, तर राहुल गांधी...; संजय राऊत 'रोखठोक' बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 3:19 PM

संजय राऊत यांना विचारलेल्या नेत्याचा आवडता गुण सांगायचा होता.

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तुलनेत आज अन्य कुठलाच नेता नाही. ते सगळ्यात लोकप्रिय नेते आहेत. त्यांनी जगात देशाची प्रतिमा निर्माण केली आहे, अशी स्तुतिसुमनं उधळत शिवसेना नेते आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणाऱ्या महाविकास आघाडीचे एक प्रमुख शिल्पकार खासदार संजय राऊत यांनी आज सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांचा 'प्रखर राष्ट्रभक्त' म्हणून गौरव करत त्यांनी मोदी सरकारच्या धडाकेबाज निर्णयांचं स्वागतच केलं आहे. 

पुण्यातील लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात खासदार, संपादक संजय राऊत यांची मुलाखत झाली. 'लोकमत'चे वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांच्या प्रश्नांना 'रोखठोक' उत्तरं दिलं. या मुलाखतीचा समारोप 'रॅपिड फायर राउंड'ने झाली. त्यात संजय राऊत यांना विचारलेल्या नेत्याचा आवडता गुण सांगायचा होता आणि त्याला एक सल्ला द्यायचा होता. त्यात त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींना 'निष्कपट' म्हणून गौरवलं आणि त्यांना अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला.  

चला, पाहू या कुणाबद्दल काय म्हणालेत राऊत...  

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड मेहनती. त्यांच्यासारखी मेहनत कुणी करणार नाही. देशाचे पंतप्रधान असल्याने त्यांना प्रत्येक गोष्ट ठाऊक आहेच. फक्त त्यांनी जरा आसपासच्या सहकाऱ्यांकडे पाहायला पाहिजे. 

अमित शाहप्रखर राष्ट्रभक्त. ज्या प्रकारचे निर्णय घेतले, ते कौतुकास्पद. अत्यंत हिमतीचे. मात्र त्यांनी या देशात लोकशाही आहे हे मान्य केलं पाहिजे. अनेक विषयात विरोधी पक्षाचं मतही समजून घेतलं पाहिजे. 

नितीन गडकरीउत्तम नेते. त्यांनी दिल्लीत जास्त काम केले पाहिजे. सातत्याने नागपूरला येऊन भाषणं करतात. महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यानं दिल्लीत ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे. 

राहुल गांधी मनाने खूप चांगले. निष्कपट. मात्र त्यांनी किमान १५ तास पक्ष कार्यालयात बसणं गरजेचं आहे.  

पाहा संजय राऊत यांची संपूर्ण मुलाखतः

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAmit Shahअमित शहाRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीNitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPuneपुणे