Join us  

Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक

Preity Zinta Mumbai Indians, powerhouse of talent:  मुंबई इंडियन्सच्या संघाने यंदा अतिशय निराशाजनक कामगिरी केली आहे. तरीही पंजाब किंग्ज संघाची सहमालकीण प्रिती झिंटाने त्या एका खेळाडूवर स्तुतिसुमने उधळली आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 5:38 PM

Open in App

Priety Zinta Mumbai Indians, a powerhouse of talent: मुंबई इंडियन्सच्या संघासाठी यंदाचा हंगाम फारसा चांगला गेलेला नाही. 11 पैकी केवळ तीन सामने जिंकल्यामुळे मुंबईचा संघ गुणतक्त्यात सर्वात तळाशी आहे. तसेच त्यांच्या प्ले-ऑफ्सच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. मुंबई इंडियन्सने यंदाच्या वर्षी नेतृत्वबदल केला. रोहित शर्माने (Rohit Sharma) मुंबईच्या संघाला पाच विजेतेपदे जिंकून दिली होती. पण यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने रोहित शर्मावर विश्वास दाखवला नाही. त्याऐवजी गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याला संघात घेत कर्णधार बनवले. पण मुंबई इंडियन्सचा कर्णधार बदलाचा निर्णय पुरता फसला. याच दरम्यान, आता पंजाब किंग्ज संघाची सहमालकीण प्रिती झिंटा हिने मुंबईच्या एका खेळाडूबद्दल मोठे विधान केले आहे.

मुंबई इंडियन्सच्या कामगिरीचे वर्णन करताना सध्या चाहते निराशाजनक हाच शब्द वापरू शकतात. मुंबईने 11 सामन्यांमध्ये फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. रोहित शर्मासारखा अत्यंत प्रतिभावान फलंदाज असूनही मुंबईच्या संघाला आपल्या कामगिरीचा ठसा उमटवता आलेला नाही. रोहितच्या कामगिरीत देखील सातत्याचा अभाव आहे. असे असले तरीही प्रिती झिंटाकडून मात्र रोहितला कौतुकोद्गार ऐकायला मिळालेले आहेत. रोहितचे वर्णन करताना प्रिती झिंटा म्हणाली की, रोहित हा टॅलेंटचा पॉवरहाऊस म्हणजे 'प्रतिभेचा साठा' आहे.

काही दिवसांपूर्वीही प्रिती झिंटाने रोहित शर्माला पंजाब संघात घेण्याबाबत एक विधान केले होते. "जर रोहित शर्मा IPL च्या मेगा लिलावात समोर आला तर मी त्याला आमच्या संघामध्ये घेण्यासाठी जीवाची बाजी लावेन. आम्हाला आमच्या पंजाब संघात फक्त एका कर्णधाराची उणीव आहे. असा कर्णधार जो डोक्याने स्थिर असेल आणि तो सामन्यात विजयी हेतूने मैदानात खेळायला उतरेल," असे विधान प्रितीने केल्याचे सांगितले जात होते. पण नंतर प्रितीने याबाबत स्पष्टीकरण दिले. "कोणताही संदर्भ न घेता असे आर्टिकल पब्लिश करणं आणि व्हायरल करणं चुकीचं आहे. मी नम्रतेने सर्वांना सांगू इच्छिते की, आमचा संघ अत्यंत चांगला असून सामने जिंकणे हाच आमचा एकमेव उद्देश असतो," असे स्पष्टीकरण प्रितीने दिले होते.

टॅग्स :आयपीएल २०२४प्रीती झिंटारोहित शर्मामुंबई इंडियन्सपंजाब किंग्स