शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

माजी मिनी महापौरांच्या पतीची निर्घृण हत्या

By admin | Updated: June 22, 2014 00:50 IST

जुन्या वैमनस्यातून माजी मिनी महापौरांच्या (झोन सभापती) पतीवर सशस्त्र हल्ला चढवून निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता स्थानिक हैदरपुरा परिसरात घडली.

दोघे जखमी : हैदरपुऱ्यातील घटनाअमरावती : जुन्या वैमनस्यातून माजी मिनी महापौरांच्या (झोन सभापती) पतीवर सशस्त्र हल्ला चढवून निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता स्थानिक हैदरपुरा परिसरात घडली. हबीब शहा ऊर्फ बशीर शहा (४८) असे मृताचे नाव आहे. तसेच जावेद शहा (२५), रशीद शहा बशीर शहा (३०) दोन्ही रा. नुरानी चौक अशी जखमींची नावे आहेत.मृत हबीब शाह हे प्रभाग क्र. ३० च्या नगरसेविका तथा माजी मिनी महापौर (झोन सभापती) फैमिदा नसरीन हबीब शहा यांचे पती होत. नागपुरी गेट पोलीस ठाण्यांतर्गत नुरानी चौकजवळील हैदरपुरा येथील रहिवासी हबीब शाह व भाचा जावेद शहा हे दोघे घरासमोर खुर्च्या टाकून बसले होते. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास त्या ठिकाणी अचानक सात ते आठ हल्लेखोरांनी हबीब शहा यांच्यावर चाकू हल्ला चढविला. हबीब शहा यांच्या मांडीवर चाकूचे तीक्ष्ण वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. हे पाहून जावेद याने हल्लेखोरांचा विरोध केला असता जावेदवरही हल्ला चढविल्याने तो जखमी झाला. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या हबीब शहा यांना जावेद याने तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र हबीब शहा यांचा रक्तस्त्राव अधिक प्रमाणात झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, हबीब शहा यांचा भाऊ रशीद शहा बशिर शहा यांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी घरी धाव घेतली असता त्यांच्यावरही हल्ला चढविल्याने तेसुद्धा जखमी झाले. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा वाद महापालिका निवडणुकीपासून आहे. मृतहबीब शहा यांच्या घरासमोरील रहिवासी शेख हबीब यांच्यात जुना वाद होता. यापूर्वी तीन वेळा हबीब शहा यांच्यावर हल्ले झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)