मेगाब्लॉक संपला तरी म.रेची वाहतूक उशीरानेच

By Admin | Updated: June 8, 2015 15:35 IST2015-06-08T08:52:10+5:302015-06-08T15:35:46+5:30

डीसी टू एसी परिवर्तनाचा विशेष ब्लॉक संपला तरी लोकल सेवा विस्कळीत असून अनेक गाड्या उशीराने धालत आहेत.

Even after the megablock has ended, the traffic is delayed | मेगाब्लॉक संपला तरी म.रेची वाहतूक उशीरानेच

मेगाब्लॉक संपला तरी म.रेची वाहतूक उशीरानेच

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ८ - मध्य रेल्वेचा डीसी टू एसी परिवर्तनाचा विशेष ब्लॉक संपला असला तरी लोकल सेवा अद्याप विस्कळीत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्य रेल्वेच्या काही लोकल १० ते १५ मिनिटे उशीराने धावत असून काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई - भुसावळ पॅसेंजर, इंटरसिटी एक्स्प्रेससही रद्द करण्यात आली..

ब्लॉकमुळे लोकल सेवा विस्कळीत असेल याची पूर्वकल्पना लोकांना देण्यात आली होती, मात्र ऐन गर्दीच्या वेळेस लोकल उशीराने धावत असल्याने अनेक स्थानकांवर मोठी गर्दी जमली आहे.  

Web Title: Even after the megablock has ended, the traffic is delayed