शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 13:39 IST

बाबा सिद्दिकींची हत्या ही घटना अतिशय दु:खद आणि गंभीर आहे. बाबा सिद्दिकींशी माझी निकटची मैत्री होती. अनेक वर्ष आम्ही सोबत काम केले आहे. - फडणवीस

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर शरद पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. या घटनेची फक्त चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून पदावरून दूर व्हा, अशा शब्दांत पवार यांनी सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांना फटकारले होते. यावर आता फडणवीसांची प्रतिक्रिया आली आहे. 

घडलेली घटना ही अतिशय दु:खद आणि गंभीर आहे. बाबा सिद्दिकींशी माझी निकटची मैत्री होती. अनेक वर्ष आम्ही सोबत काम केले आहे. त्यामुळे जी काही घटना घडली त्याने आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. या केस मधले दोन आरोपी पकडलेले आहेत. अजून तपास चालू आहे. काही धागे दोरे मिळत आहेत. पण त्या संदर्भात आता लगेच बोलणे योग्य होणार नाही. आज त्यांची कस्टडी झाल्यानंतर जेवढी माहिती देता येईल, तेवढी पोलिस माहिती देतील, असे फडणवीस म्हणाले. 

तसेच शरद पवार यांना फक्त केवळ सत्ताच पाहीजे. इतकी गंभीर घटना झाल्यानंतर ही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे. आमच्या नजरेसमोर फक्त महाराष्ट्र आहे. आम्हाला महाराष्ट्राकडे पाहायचे आहे, महाराष्ट्राचा विकास, सुरक्षा पाहिजे. त्यामुळे जे खुर्चीकडे पाहतायतात त्यांनी ते पाहावे, त्यांना जे बोलायचेय ते बोलावे, असे फडणवीस म्हणाले.  

ज्या काही थेअरीज येतायत तशा प्रकारचे घडलेले नाहीय. ज्यांना जे वाटतेय तशा प्रकारच्या बातम्या चालवल्या जात आहेत. हत्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. पोलिस यासंदर्भात माहिती देतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

शरद पवार काय म्हणालेले..."राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे," अशा शब्दांत शरद पवार यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. तसंच मी बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो, असंही पवार यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस