अभियंत्याने पत्नीसह दोन मुलींना संपविले!

By Admin | Updated: March 11, 2015 01:39 IST2015-03-11T01:39:55+5:302015-03-11T01:39:55+5:30

आयआयटी खरगपूर येथून शिक्षण घेतलेल्या अभियंत्याने पत्नीसह दोन चिमुकलींना ठार मारल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी रात्री उशिरा

Engineers killed two daughters with wife | अभियंत्याने पत्नीसह दोन मुलींना संपविले!

अभियंत्याने पत्नीसह दोन मुलींना संपविले!

संजय खासबागे, वरुड (जि. अमरावती)
आयआयटी खरगपूर येथून शिक्षण घेतलेल्या अभियंत्याने पत्नीसह दोन चिमुकलींना ठार मारल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी रात्री उशिरा उघडकीस आला. शिल्पा प्रवीण मनवर (३०), शर्वरी (१०) आणि परिणीती (पावणे दोन वर्षे) अशी दुर्दैवी मायलेकींची नावे आहेत़ प्रवीण ज्ञानेश्वर मनवर (३८) असे अभियंत्याचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे़
मध्य प्रदेशातील छत्तरपूरमध्ये ह्यनॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशनह्णमध्ये अभियंता असलेला प्रवीण पत्नी शिल्पा व दोन मुलींसह २८ फेब्रुवारी रोजी अमरावतीत सखारामजी ढाणके यांच्याकडे आला होता. २ मार्च रोजी वरुड पांढुर्णामार्गे हे कुटुंब कारने छत्तरपूरकडे रवाना झाले. पहाडीवाले बाबा मंदिरा परिसरातील वळणावर प्रवीणने कारवर पेट्रोल शिंपडले. पेटवून देत ती दरीत ढकलली. बंद कारमध्येच तिघी मायलेकींचा कोळसा झाला. मित्राच्या सल्लयानंतर सोमवारी रात्री प्रवीण अमरावतीत राजापेठ पोलिसांना शरण आला.
पोलिसांना रात्रीच घटनास्थळाची पाहणी केली़ मात्र, अंधरामुळे
त्यांच्या हाती काही लागले नाही़ मंगळवारी सकाळी पुन्हा घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांना कार आणि तीन मृतदेह आढळून आले़ घटनास्थळ मध्यप्रदेशातील मुलताई पोलिसांच्या हद्दीत असल्याने त्यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन प्रवीण मनवर याला अटक केलीे.

Web Title: Engineers killed two daughters with wife