शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील मराठी विषयाच्या शिक्षकांना रोजगाराची संधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 12:58 IST

राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या काही शाळांमध्ये मराठी विषय शिकवलाच जात नाही, तर काही शाळांमध्ये मराठी विषयाला पर्यायी विषय देण्यात आला आहे.

ठळक मुद्देसरकारने विषय सर्वांसाठी केला सक्तीचा : चौदा हजार इंग्रजी शाळाइतर बोर्डांच्या शाळांमध्येच मराठी विषयाच्या शिक्षकांची नियुक्ती करावी लागणार

राहुल शिंदे - पुणे : राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येमराठी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यामुळे पुढील काळात मराठी विषयाच्या शिक्षकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. राज्यात इंग्रजी माध्यमाच्या १४ हजार २८१ शाळा आहेत. मात्र, या शाळांमध्ये कोणत्या इयत्तेपासून मराठी विषय सक्तीचा असेल, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे मराठीच्या नेमक्या किती हजार शिक्षकांना रोजगार उपलब्ध होईल, हे आताच सांगता येणार नाही.राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या काही शाळांमध्ये मराठी विषय शिकवलाच जात नाही, तर काही शाळांमध्ये मराठी विषयाला पर्यायी विषय देण्यात आला आहे. परंतु, महाराष्ट्रात राहूनसुद्धा अनेक विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे ज्ञान घेता येत नाही. त्यामुळेच राज्य शासनाने राज्यातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मराठी शिकविणे बंधनकारक केले. याबाबत कायदा केला जाणार असल्याने कोणत्याही शाळेला कायद्याचे उल्लंघन करता येणार नाही. परिणामी, शाळेमध्ये मराठी विषय शिकविण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करावी लागेल. राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, राज्यात इंग्रजी माध्यमाच्या एकूण १४ हजार २८१ शाळा आहेत. यातील राज्य मंडळाच्या (एससीसी बोर्ड) शाळांमध्ये मराठी विषय शिकवला जातो. त्यामुळे सीबीएसईसह इतर सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये मराठीच्या शिक्षकांची आवश्यकता भासणार आहे. त्यातच इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या संस्थाचालक संघटनेच्या पदाधिकाºयांनी शासन निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच, आपल्या शाळांमध्ये मराठी विषयाच्या शिक्षकांच्या नियुक्त्या करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे.राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवारांनाच शाळांमध्ये शिक्षक म्हणून अधिकृतपणे नोकरी दिली जाते. गेल्या पाच वर्षांत ६७ हजार ७०६ उमेदवार टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील केवळ ५ हजार ८०० उमेदवारांना पवित्र पोर्टलच्या माध्यमातून रोजगार मिळाला आहे. .........

निर्देशानुसार शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्तीशासनाने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो. राज्यात इंग्रजी माध्यमाच्या सुमारे २२ हजार शाळा असून, त्या शाळांमध्ये मराठी विषयाच्या शिक्षकांची नियुक्ती करावी लागणार आहे. त्यामुळे मराठीच्या शिक्षकांना इंग्रजी शाळांमध्ये रोजगार उपलब्ध होईल. मात्र, कोणत्या इयत्तेपासून मराठी विषय सक्तीचा असेल, याबाबत शासनाने निर्देश दिलेले नाहीत. प्राप्त होणाºया निर्देशानुसार शाळांमध्ये शिक्षक नियुक्तीचे नियोजन केले जाईल.- राजेंद्र सिंग, कार्याध्यक्ष, इंडिपेन्डेंट इंग्लिश स्कूल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य............राज्यातील बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी विषय शिकविला जातो. त्यामुळे एसएससी बोर्डाच्या शाळा सोडून इतर बोर्डांच्या शाळांमध्येच मराठी विषयाच्या शिक्षकांची नियुक्ती करावी लागेल. त्यामुळे पुढील काळात मराठीच्या शिक्षकांची काही प्रमाणात मागणी वाढेल.- संजय तायडे, अध्यक्ष, मेस्टा, महाराष्ट्र राज्य. 

राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळांमध्ये मराठी विषयाचे शिक्षक नाहीत, अशा शाळांना येत्या शैक्षणिक वर्षापासून मराठी विषयाच्या शिक्षकांची नियुक्ती करावी लागेल. त्यामुळे काही शिक्षकांना रोजगार मिळू शकेल - दत्तात्रय जगताप, संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य. 

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणSchoolशाळाenglishइंग्रजीmarathiमराठीStudentविद्यार्थी