शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर

By admin | Updated: July 10, 2014 00:37 IST

शिक्षण विभागाकडून राबविण्यात आलेल्या अकरावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या ऑनलाइन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर झाली.

नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल असलेला न्यायालयीन कैदी मंगळवारी सायंकाळी बेपत्ता झाल्याचे उघडकीस आल्यानंतर सकाळी एका शौचालयावर असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. मयत कैद्याने आत्महत्त्या केल्याची नोंद पोलिसांनी केली असली, तरी त्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्याखाली नाना नामदेव पाटील (वय ४७) यास ३१ मे रोजी अटक करून ४ जून रोजी मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्याच्यावर नाशिक शहरात तीन, भिवंडी, सुरत, गुजराथ या ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.कारागृहात मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे कैद्याची हजेरी घेण्यात आली. यावेळी कारागृहातील २२५० कैद्यांपैकी २२४९ कैदीच हजर होते. कैदी नाना पाटील बेपत्ता असल्याचे निदर्शनास येताच कारागृह प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली. परंतु त्यांचा कुठेच ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला होता. आज पुन्हा बेपत्ता कैदी नाना पाटील याचा शोध घेण्यास सुरुवात झाली. कारागृहातील मंडल क्रमांक ७ वॉर्ड क्रमांक ५ मधील बॅरेक क्रमांक १ च्या पाठीमागील बाजूस शौचालय आहे. शौचालयाच्या स्लॅबवर ५०० लिटरची सिन्टेक्सची पाण्याची टाकी असून, त्यामध्ये सकाळी आठ वाजेच्या सुमारास नाना पाटील याचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तहसीलदार यांच्या उपस्थितीत व व्हिडीओ चित्रीकरणाद्वारे पंचनामा व इतर सर्व कार्यवाही करून धुळ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेबाबत मात्र कारागृह व पोलीस वर्तुळात संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. (प्रतिनिधी)