शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीचा प्रवेश आॅनलाइनच

By admin | Updated: June 17, 2015 04:07 IST

करावीच्या सर्व जागा आॅनलाईननेच भरा, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य शासनाला दिले. मॅनेजमेंट कोट्यासाठी राखीव

मुंबई : अकरावीच्या सर्व जागा आॅनलाईननेच भरा, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य शासनाला दिले. मॅनेजमेंट कोट्यासाठी राखीव असलेल्या जागा सोडून इतर जागा आॅनलाईनेच भरा. आॅनलाईन प्रवेशाची तिसरी यादी जाहीर झाल्यानंतर जागा शिल्लक राहिल्यास त्याची नव्याने जाहिरात द्या व त्याही जागा आॅनलाईनेच भरा, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. न्या. नरेश पाटील व न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. या आदेशाची अंमलबजावणी केली जाईल, असे सरकारी वकील दिनेश खैरे यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले.आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत दोष असल्याने यात बदल करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका पुण्यातील वैशाली बाफना यांनी केली आहे. त्यावर आज सुनावणी झाली. (प्रतिनिधी)सरकार म्हणे, प्रक्रिया पारदर्शकयाची दखल घेत न्यायालयाने या प्रवेश प्रक्रियेत बदल करा, अशी सूचना करत याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश शासनाला मार्च महिन्यात दिले होते. मात्र ही प्रक्रिया कशी पारदर्शक आहे, हे पटवून देणारे प्रतिज्ञापत्र शासनाने न्यायालयात सादर केले.कोट्याचे प्रवेश कधी भरायचे?-पुण्यातील वैशाली बाफना यांच्या याचिकेवर मंगळवारी खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यात अ‍ॅड. खैरे यांनी या नियमानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात असल्याचे न्यायालयाला सांगितले. -गेल्यावर्षी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत शिल्लक राहिलेल्या जागा शासनाने मॅनेजमेंट कोट्याला दिल्या व शिल्लक जागा भरल्या गेल्या, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने वरील आदेश दिले. -तसेच मॅनेजमेंट कोट्याचे प्रवेश कधी व कसे भरणार याचेही आदेश शासनाने संबंधित महाविद्यालयांना द्यावे, असे खंडपीठाने स्पष्ट केले. यावरील पुढील सुनावणी २ जुलैला होणार आहे.