शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या उपनगरात विजेचा लपंडाव

By admin | Updated: June 8, 2017 02:24 IST

मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरात मागील काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरात मागील काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, कुर्ला, मरोळ या ठिकाणी वीजपुरवठा खंडित होत असल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. महत्त्वाचे म्हणजे वीजपुरवठा खंडित झाल्यावर हेल्पलाइनवरून काहीच मदत मिळत नसल्याची खंत रहिवाशांनी व्यक्त केली आहे.स्थानिक रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टाटा पॉवरच्या विलेपार्ले ते मरोळ, एअरपोर्ट रोड, जोगेश्वरी, गोरेगावपर्यंतच्या भागात साधारणत: १८ ते २४ तास वीजपुरवठा खंडित होत आहे. महत्त्वाचे म्हणजे ऐन उकाड्यात विजेचा लंपडाव सुरू असल्याने रहिवासी उकाड्याने हैराण झाले आहेत. शिवाय जून महिन्यातही वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत असून, टाटा पॉवरकडून रहिवाशांच्या समस्येची काहीच दखल घेतली जात नाही.३ जून रोजी १८ तास, १३ मे रोजी २४ तास आणि अन्य साधारणत: ३५ वेळा वीजपुरवठा खंडित झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे वीजपुरवठा खंडित झाला असतानाच हेल्पलाइनवरून काहीच मदत मिळत नाही. उपकेंद्रावर रहिवासी दाखल झाले असता मरोळ येथील केबल नादुरुस्ती, भारनियमन, डबल केबल फॉल्ट अशी अनेक कारणे यावर दिली जातात. परिणामी, वीज कंपनीने या समस्येची दखल घ्यावी आणि समस्या सोडवावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.पश्चिम उपनगरात अनियमित वीजपुरवठ्याबाबत करण्यात आलेल्या आरोपांचे टाटा पॉवरने खंडन केले आहे. एप्रिल आणि मे महिन्यांत पश्चिम उपनगरातील बहुतांशी ग्राहकांनी केलेल्या तक्रारी चेंजओव्हर ग्राहकांच्या होत्या. या ग्राहकांना आम्ही वीजपुरवठा करत नाही. टाटा पॉवर नेटवर्कच्या काही ग्राहकांचा दोन डबल केबल फॉल्टमुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. विविध सरकारी आणि खासगी संस्थांमार्फत केल्या जात असलेल्या खोदकामामुळे हे डबल फॉल्टचे प्रकार घडले होते. या प्रकाराची दखल तातडीने घेण्यात आली, असे स्पष्टीकरण टाटा पॉवरकडून देण्यात आले आहे.