शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कुणाल पाटीलविरुद्धची निवडणूक याचिका फेटाळली

By admin | Updated: October 27, 2015 01:55 IST

गेल्या निवडणुकीत धुळे ग्रामीण मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेलेले काँग्रेसचे आमदार कुणाल (बाबा) रोहिदास पाटील यांच्या निवडणुकीस आव्हान

मुंबई : गेल्या निवडणुकीत धुळे ग्रामीण मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेलेले काँग्रेसचे आमदार कुणाल (बाबा) रोहिदास पाटील यांच्या निवडणुकीस आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी फेटाळली.कुणाल पाटील यांच्याकडून ४६,०८२ मतांनी पराभूत झालेले भाजपाचे उमेदवार मनोहर दत्तात्रय भदाणे यांनी ही याचिका केली होती. पाटील यांनी उमेदवारी अर्जासोबत केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या व कुटुंबीयांच्या मालमत्तांची संपूर्ण माहिती दिली नाही, तसेच सरकारकडून मिळालेल्या कंत्राटाची माहितीही दडवून ठेवली. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने स्वीकारला गेल्याने, त्यांची निवड रद्द करावी आणि त्यांच्याऐवजी आपण विजयी झाल्याचे जाहीर करावे, अशी भदाणे यांची विनंती होती.मात्र, भदाणे यांच्यासाठी ज्येष्ठ वकील व्ही. डी. होन व पाटील यांच्यासाठी ज्येष्ठ वकील पी.एम. शहा यांचा युक्तिवाद सविस्तर ऐकल्यानंतर न्या. मदन टी. पाटील यांनी याचिका फेटाळली.कुणाल पाटील संचालक असलेल्या समृद्धी रिसोर्सेस लि. या कंपनीने महाराष्ट्र मारिटाइम बोर्डाकडून कौथनी मिनिपोर्टचे एक टर्मिनल भाडेपट्ट्याने घेतले आहे. परंतु त्यांनी प्रतिज्ञापत्रात याची माहिती दिली नाही, असा भदाणे यांचा मुद्दा होता, परंतु या संदर्भात कायद्याला जे ‘सक्षम सरकार’ अपेक्षित आहे, त्याच्या व्याख्येत मारिटाइम बोर्ड येत नाही, हे अ‍ॅड. होन यांनीही मान्य केले. परिणामी, या मुद्द्यावर पाटील निवडणूक लढण्यास अपात्र ठरत नाहीत, असे न्यायालयाने म्हटले.कुणाल पाटील काही कंपन्यांचे संचालक आहेत, पण त्यांनी या कंपन्यांच्या मालमत्ता व देणी यांचा तपशील दिला नाही, तसेच ते काही सार्वजनिक विश्वस्त निधींचेही विश्वस्त आहेत.उमेदवार आणि त्याच्या निकटवर्ती कुटुंबीयांच्या नावे असलेल्या मालमत्ता व देणी यांची मतदारांना माहिती व्हावी, हा प्रतिज्ञापत्र करायला लावण्यामागचा मुख्य उद्देश आहे, परंतु म्हणून हा तर्क आणखी ताणून उमेदवाराने तो स्वत: किंवा त्याचे कुटुंबीय संचालक किंवा विश्वस्त असलेल्या कंपन्या व ट्रस्ट यांच्या मालमत्ता व देण्यांचाही तपशील द्यावा, असे म्हटले जाऊ शकत नाही. (विशेष प्रतिनिधी)