शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

‘ठिबक सिंचन’ची ईडीकडून चौकशी? २५० कोटींचा घाेटाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2021 7:00 AM

ठिबक सिंचन अनुदान हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्याऐवजी पुरवठादार कंपन्यांच्या खात्यामध्ये टाकले जात असे.  त्यामुळे या पुरवठादार कंपन्यादेखील चौकशीच्या घेऱ्यात येण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आघाडी सरकारच्या काळात २००८ ते २०११ दरम्यान झालेल्या सुमारे २५० कोटी रुपयांच्या ठिबक सिंचन घोटाळ्याची चौकशी ईडीमार्फत होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात ईडीकडे तक्रारी करण्यात आल्याचा दावा काही वृत्तवाहिन्यांनी केला.ठिबक सिंचन अनुदानाचा विषय हा कृषी विभागांतर्गत येतो. सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने मागील सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्यासाठी ज्येष्ठ आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पूर्वीच्या आघाडी सरकारच्या काळातील ठिबक सिंचन घोटाळ्याचा विषय पुढे आला आहे. कृषी खात्याच्या काही अधिकाऱ्यांनी वितरकांशी  संगनमत करून मोठ्या प्रमाणात अनुदान लाटले होते, अशा तक्रारी आहेत. 

त्या वेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपने सदर घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर चौकशीचे आश्वासन तत्कालीन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले होते. तसेच काही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी २०११ मध्ये विधिमंडळ अधिवेशनात केली होती. या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींच्या आधारे कृषी खात्याच्या दक्षता विभागाकडून ईडीने काही कागदपत्रे मागविल्याची माहिती आहे.

त्या काळात ठिबक सिंचन अनुदान हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्याऐवजी पुरवठादार कंपन्यांच्या खात्यामध्ये टाकले जात असे. त्यामुळे या पुरवठादार कंपन्यादेखील चौकशीच्या घेऱ्यात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस