Join us  

Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 1:19 PM

Smriti Irani Tax Saving Funds : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या जाहीरनाम्यात म्युच्युअल फंडात ८८ लाख रुपयांहून अधिक गुंतवणूक केल्याचा खुलासा केलाय.

Smriti Irani Tax Saving Funds : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गेल्या आठवड्यात अमेठी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक आयोगाला (ECI) सादर केलेल्या जाहीरनाम्यात त्यांनी म्युच्युअल फंडात (Mutual Funds) ८८ लाख रुपयांहून अधिक गुंतवणूक केल्याचा खुलासा केलाय. स्मृती इराणी (Smriti Irani) यांची ७ म्युच्युअल फंड स्कीम्समध्ये गुंतवणूक आहे. यापैकी केवळ एक ईएलएसएस हा टॅक्स सेव्हिंग फंड आहे. केंद्रीय मंत्र्यांनी गुंतवलेल्या एकमेव टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड स्कीमनं ६०.६४ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत इराणी यांच्या या योजनेतील गुंतवणुकीचं मूल्य १८ लाख रुपयांपेक्षा जास्त होतं. ईएलएसएस या म्युच्युअल फंडांच्या अशा स्कीम्स असतात ज्या टॅक्स सेव्हिंगमध्ये मदत करतात. 

मोतीलाल ओसवाल ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड हा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पोर्टफोलिओमध्ये असलेला एकमेव टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड आहे. ही एक ओपन एंडेड इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम आहे. यात ३ वर्षांचा लॉक-इन पीरियड आणि टॅक्स बेनिफिट्स आहेत. २१ जानेवारी २०१५ रोजी या फंडाची सुरुवात करण्यात आली. 

मोतीलाल ओसवाल टॅक्स सेव्हर फंडाची होल्डिंग्स 

मार्च २०२४ तिमाहीत म्युच्युअल फंड योजनांच्या टॉप होल्डिंग्समध्ये झोमॅटो, मुकेश अंबानी समर्थित जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, ट्रेंट, ग्लोबल हेल्थ आणि इंडसइंड बँक यांचा समावेश आहे. हे शेअर्स ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंडाच्या टॉप ५ होल्डिंग्समध्ये आहेत. याशिवाय मोतीलाल ओसवाल फंडाने आयसीआयसीआय बँकेचेही शेअर्सही खरेदी केले आहेत. 

ईएलएसएस टॅक्स सेव्हिंग फंडाचे फायदे 

वेतन घेणाऱ्या व्यक्तींसाठी हे फंड सर्वात योग्य आहेत. त्याद्वारे करदाते आपला इन्कम टॅक्सचा बोजा कमी करू शकतात. ईएलएसएस म्युच्युअल फंड स्कीमवर इन्कम टॅक्स कायदा १९६१ च्या कलम ८० सी नुसार एका आर्थिक वर्षात १,५०,००० रुपयांपर्यंत टॅक्स बेनिफिट मिळते. 

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :स्मृती इराणीगुंतवणूकलोकसभा निवडणूक २०२४