ED will also investigate the irrigation scam, documents requested from the corporation | ‘ईडी’ही करणार जलसिंचन घोटाळ्याची चौकशी, महामंडळाकडून मागविली कागदपत्रे 

‘ईडी’ही करणार जलसिंचन घोटाळ्याची चौकशी, महामंडळाकडून मागविली कागदपत्रे 


मुंबई : काँग्रेस आघाडीच्या काळात घडलेल्या कथित जलसिंचन घोटाळ्याची चौकशी आता सक्तवसुली संचालनालय (ईडी) करणार आहे. त्यासंबंधी व्यवहाराच्या सर्व कागदपत्रांची मागणी पाटबंधारे विभाग व संबंधित महामंडळाकडे  करण्यात आल्याचे 
सूत्रांनी सांगितले. 

१९९९ ते २०११ या कालावधीत राज्यात राबविल्या गेलेल्या सिंचन प्रकल्पात घोटाळा झाल्याची तक्रार विरोधी पक्षाने केली होती. त्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर त्यांच्या आदेशानंतर एसआयटी नेमून तपास करण्यात आला. त्यांनी क्लीन चिट दिली. मात्र आता या प्रकरणात ईडी तपास करणार आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ED will also investigate the irrigation scam, documents requested from the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.