अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांची उद्या ईडीकडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 11:16 IST2021-07-05T11:15:29+5:302021-07-05T11:16:39+5:30

ऋषिकेश हे सांभाळीत असलेल्या विविध कंपन्या आणि त्याच्यातील आर्थिक गैरव्यवहार समोर आले आहेत.

ED inquiry of Rishikesh Deshmukh tomorrow | अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांची उद्या ईडीकडून चौकशी

अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांची उद्या ईडीकडून चौकशी

मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख (Rishikesh Deshmukh) यांनाही चौकशीसाठी पाचारण केले आहे. त्यांना मंगळवारी (दि.६) सकाळी कार्यालयात अकरा वाजता हजर राहण्याची सूचना केली आहे. (ED inquiry of Rishikesh Deshmukh tomorrow)

ऋषिकेश हे सांभाळीत असलेल्या विविध कंपन्या आणि त्याच्यातील आर्थिक गैरव्यवहार समोर आले आहेत. त्याबाबत त्यांचीही ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी त्यांना समन्स बजाविण्यात आले आहे. देशमुख यांच्यानंतर त्यांची चौकशी केली जाणार असल्याचे असे सूत्रांनी सांगितले.
 

Web Title: ED inquiry of Rishikesh Deshmukh tomorrow