शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
5
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
6
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
7
Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी
8
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
9
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
10
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
11
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
12
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
13
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
14
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
15
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
16
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
17
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
18
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
19
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
20
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल, प्राथमिक तपासानंतर बजावणार समन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 4:42 AM

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) यासंदर्भात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने  ईडी आता त्यातील आर्थिक व्यवहारांबाबत देशमुख यांच्याकडे चौकशी करणार आहे. प्राथमिक तपासानंतर त्यांना त्यासाठी समन्स बजाविले जातील, असे सूत्रांनी सांगितले.

 मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) मनी लाॅन्ड्रिंगअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुंबईचे तत्कालीन पाेलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपाप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) यासंदर्भात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने  ईडी आता त्यातील आर्थिक व्यवहारांबाबत देशमुख यांच्याकडे चौकशी करणार आहे. प्राथमिक तपासानंतर त्यांना त्यासाठी समन्स बजाविले जातील, असे सूत्रांनी सांगितले.मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी २० फेब्रुवारीला ‘लेटर बॉम्ब’द्वारे  देशमुख यांच्यावर आरोप केले होते. त्याबद्दल उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने या प्रकरणाचा प्राथमिक तपास करून देशमुख व अन्य अनोळखी इसमावर सोमवारी गुन्हा दाखल केला. दरम्यान, देशमुख यांच्या घर व कार्यालयावर छापे टाकण्यात आले होते. ईडी त्याच अहवालाच्या आधारे शंभर कोटी वसुली प्रकरण, बदल्यांसाठी पैसे घेण्यात आल्याच्या आरोपाचा तसेच अन्य आर्थिक बाबींचा तपास करणार आहे. कथित रक्कम कोणत्या माध्यमातून घेण्यात आली, तिचा वापर कुठे व कसा झाला, देशमुख यांच्या मुलांच्या नावावरील कंपन्या, त्यांच्या नातेवाइकांच्यानावे असलेल्या कोलकात्यातील शेल कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यात आली का, या सर्वांचा तपास  ईडी करणार असून देशमुख यांना चौकशीसाठी पाचारण केले जाणार असल्याचे समजते. 

आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य झाले नसताना, केंद्र सरकारने राजकीय द्वेषातून गुन्हा दाखल केला आहे. मात्र जसे सीबीआयला सहकार्य केले, तसेच ईडीच्या तपासातही सहकार्य करणार. ‘सत्य परेशान हो सकता हे, लेकिन पराजित नही.’      - अनिल देशमुख, माजी गृहमंत्री  

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNCPराष्ट्रवादी काँग्रेस