शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अंतराळातून आला ‘इबोला’?

By admin | Updated: January 14, 2015 01:12 IST

जगात ‘इबोला’ तसेच इतर काही नवीन पण भयंकर रोगांमुळे दहशत आहे. याबाबत वैद्यकशास्त्राप्रमाणेच खगोलशास्त्राच्या दृष्टीनेदेखील जगभरात अभ्यास सुरू आहे. अंतराळातून धुमकेतू किंवा

संशोधकांचा अभ्यास सुरू : नारळीकरांच्या ‘क्लास’ने विद्यार्थी ‘इन्स्पायर’ नागपूर : जगात ‘इबोला’ तसेच इतर काही नवीन पण भयंकर रोगांमुळे दहशत आहे. याबाबत वैद्यकशास्त्राप्रमाणेच खगोलशास्त्राच्या दृष्टीनेदेखील जगभरात अभ्यास सुरू आहे. अंतराळातून धुमकेतू किंवा अशनीच्या माध्यमातून या रोगांचे जीवाणू पृथ्वीवर आले का याबाबत संशोधकांनी अभ्यासाला सुरुवात केली आहे. सध्या ही केवळ शक्यता असली तर अभ्यासाअंती वेगळा निष्कर्ष बाहेर निघण्याची बाब नाकारता येत नाही, अशी माहिती ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांनी दिली. केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे प्रायोजित व शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजित ‘इन्स्पायर’ या विज्ञान शिबिरात नारळीकरांनी विद्यार्थ्यांशी मोकळेपणाने संवाद साधला. यावेळी त्यांनी वरील माहिती दिली.Þडॉ. नारळीकर यांनी खगोलशास्त्राच्या इतिहासापासून ते भविष्यात होऊ शकणाऱ्या घडामोडींपर्यंत निरनिराळ्या मुद्यांवर प्रकाश टाकला. इतर वैज्ञानिक शाखा पृथ्वीपर्यंत मर्यादित आहेत तर खगोलशास्त्राची झेप पृथ्वीबाहेर पसरलेल्या अमाप विश्वापर्यंत आहे. न्यूटनचा नियम पृथ्वीबाहेर कोट्यवधी किलोमीटरपर्यंत लागू होतो हे विधान फक्त खगोलशास्त्रच करू शकतो. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावण्याचे श्रेय सर आयझॅक न्यूटन यांना देण्यात येते.परंतु केवळ सफरचंद त्यांच्या डोक्यावर पडले म्हणून हा शोध लागला नाही. तर त्याअगोदर होऊन गेलेले खगोलशास्त्रज्ञ व अभ्यासक टायको व केपलर यांच्या अभ्यासातून समोर आलेल्या बाबींवर हे प्रमेय मांडण्यात आले होते असे डॉ.नारळीकर यांनी सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवेंद्र बुरघाटे हे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. अशोक बंड यांनी संचालन केले.२१२६ वर्षात पृथ्वीला धोकाखगोलशास्त्रातूनच पृथ्वीवर भविष्यात येणाऱ्या धोक्यांबद्दल भाकीत करणे शक्य झाले आहे. ‘स्विफ्ट टटल’ नावाचा धूमकेतूची २० आॅगस्ट २१२६ रोजी पृथ्वीशी टक्कर होऊ शकते, असे अभ्यासातून समोर आले आहे. परंतु अद्याप याला बराच वेळ आहे. त्यामुळे त्याचा मार्गात बदल होऊ शकतो. याबाबत निश्चित भाष्य या घटनेच्या काही वर्ष अगोदरच करता येणे शक्य आहे. या अभ्यासात खगोलशास्त्राचीच महत्त्वाची भूमिका राहणार आहे, असे डॉ.नारळीकर म्हणाले. अंतराळातून ऊर्जा घेणे शक्यआज ज्या पद्धतीने ऊर्जेचा वापर होत आहे ते पाहता ऊर्जानिर्मितीसाठी नवीन पर्याय शोधणे क्रमप्राप्त झाले आहे. अंतराळात मोठमोठाले भिंग स्थापित करून सौरप्रकाश जास्त प्रमाणात पृथ्वीकडे वळवून ऊर्जानिर्मिती करणे शक्य आहे. परंतु याचा खर्च प्रचंड असल्याने सद्यस्थितीत कुठल्याही देशाने याकरिता पुढाकार घेतलेला नाही या त्यांनी दिलेल्या माहितीमुळे उपस्थित आश्चर्यचकित झाले. गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यास करण्यासाठी अमेरिका, युरोप, जपान या देशांनी अत्याधुनिक टेलिस्कोप असणाऱ्या वेधशाळा उभारल्या आहेत. रेखांशावरील स्थान लक्षात घेता भारतातदेखील अशी वेधशाळा उभारण्यास अमेरिकेने सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे. यासाठी महाराष्ट्रातील नांदेड, राजस्थान आणि मध्य प्रदेश ही ठिकाणे योग्य आहेत. यातील एकाची निवड करण्यासाठी संंबंधित प्रस्तावाला केंद्र सरकारकडे चर्चेसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. नारळीकर यांनी दिली.(प्रतिनिधी)