पाण्याच्या हौदात बुडून चिमुकल्याचा मृत्यू

By Admin | Updated: March 15, 2017 20:04 IST2017-03-15T20:04:00+5:302017-03-15T20:04:00+5:30

पाण्याच्या हौदात बुडून चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोलापूरमध्ये घडली आहे.

Dying of water fluttering in the air | पाण्याच्या हौदात बुडून चिमुकल्याचा मृत्यू

पाण्याच्या हौदात बुडून चिमुकल्याचा मृत्यू

>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 15 - पाण्याच्या हौदात बुडून चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोलापूरमध्ये घडली आहे. पेनूर (ता़ मोहोळ) येथील समर्थ संदीप गंगथडे (वय ९ वर्षे) याचा घराच्या पाठीमागे असणा-या पाण्याच्या हौदामध्ये बुडून दुर्दैवी अंत झाला़.
 
समर्थ हा जिल्हा परिषदेच्या टेकळे वस्ती येथील शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत होता. समर्थ हा नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर ११: ३० वाजता शाळेतून घरी परत आला. त्यावेळी घराच्या पाठीमागे शेतीच्या कामासाठी खणलेल्या हौदाजवळ खेळत असताना त्याचा पाय घसरला आणि तो  हौदात पडला. 
 
समर्थ बराच वेळ न दिसल्याने त्याच्या आईने त्याची शोधाशोध केली असता समर्थ हौदात पडलेला आढळून आला. त्यानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले. परंतू उपचारापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला. या घटनेमुळे पेनूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 

Web Title: Dying of water fluttering in the air