शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

तुळजाभवानीच्या पैशांवर डल्ला; ६२ जणांवर ठपका

By admin | Updated: August 24, 2016 06:14 IST

तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीतील ७ कोटी १९ लाखांच्या गैरव्यवहार प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषन विभागाने ६२ जणांवर ठपका ठेवला

उस्मानाबाद : महाराष्ट्राचे कुलदैवत व साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीतील ७ कोटी १९ लाखांच्या गैरव्यवहार प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषन विभागाने (सीआयडी) ११ आयएएस अधिकाऱ्यांसह, नऊ उपविभागीय अधिकारी, नऊ तहसीलदार, दहा ठेकेदार, मंदिराचा कारभार पाहणारे १४ जण आणि नऊ राजकारणी, अशा ६२ जणांवर ठपका ठेवण्यात आला असून, या सर्वांवर फौजदारी कारवाई करण्याची शिफारस केली आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्यांची खातेअंतर्गत चौकशी करण्याची तर राजकारण्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी सीआयडीने राज्य सरकारवर सोपविली आहे. श्री तुळजाभवानी मंदिरातील दानपेटीमध्ये भक्तांनी मोठ्या प्रमाणात मौल्यवान वस्तू दान केल्या होत्या. १९९१ ते २००९ या कालावधीत लिलावधारकांनी दानपेटीतील या मौल्यवान वस्तूंचा गैरव्यवहार केल्याचा आरोप असून, या प्रकरणाची सुमारे पाच वर्षांपासून सीआयडीमार्फत चौकशी सुरू होती. सीआयडीने अहवाल नुकताच गृह विभागाकडे सादर केला असून तो ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. असा झाला पर्दाफाशदानपेटीमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी यामध्ये लक्ष घातले. त्यानंतर हा गैरव्यवहार पुढे आला. एकेदिवशी ठेकेदाराला बाजुला सारून त्यांनी दानपेट्यांमधील उत्पन्न मोजले असता त्या दिवशीचे उत्पन्न ९९ हजार ५६४ रुपये म्हणजेच वार्षिक ३ कोटी ६३ लाख ४० हजार रुपये निघाले. त्यावर्षी दानपेट्यांचा लिलाव २ कोटी ६७ लाखांचा झाला होता. म्हणजे एकाच वर्षी मंदिराचे ९६ लाखांचे नुकसान झाले होते. या प्रकरणाची चौकशी सुरू करून सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी आणि त्यानंतर विशेष लेखापरिक्षकांनीही गैरव्यवहाराबाबत अहवाल सादर केला. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन १४ डिसेंबर २०१४ रोजी गृहसचिवांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले. परंतु, मंदिर व्यवस्थापनाने या चौकशीसाठी आवश्यक सहकार्य केले नाही. त्यामुळे सीआयडीने २०१० पासून उतरत्या क्रमाने १५ टक्के घट गृहीत धरून सोने किती आले असावे, असा अंदाज बांधला. सीआयडीच्या दाव्यानुसार वीस वर्षांत ३९ किलो सोने आणि ६०८ किलो चांदीचा गैरव्यवहार झाला. त्याकाळी सोन्या-चांदीचे दर काय होते, यावर अपहाराचा आकडा निश्चित केल्याने सदर अपहार ७ कोटी १९ लाखांचा झाल्याचा ठपका सीआयडीने ठेवला आहे. (प्रतिनिधी)>हेच ते सनदी अधिकारीअनिल पवार, संजय कुमार, राजेश कुमार, मधुकर कोकाटे, सुरेंद्रकुमार बागडे, शिरीष कारळे, संजय अग्रवाल, एस. चोकलिंगम, आशिष शर्मा आणि एम. पी. देवणीकर व एक मयत अशा या ११ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला असून, त्यांची शासनाने खातेअंतर्गत चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मंदिराचे कारभारी : दिलीप नाईकवाडी, एन. एस. कोळेकर, अमृतराव, बेंदे, ढवळे, मार्तंड बंडगर, वैजीनाथ सोनवणे, बाळकृष्ण कावरे, अनिल चव्हाण, युवराज साठे, राजकुमार भोसले, दिनकर प्रयाग, देविदास पवार आणि डी. बी. कदम >सीआयडीच्या अहवालातील धक्कादायक खुलासे उस्मानाबादचे तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल पवार यांनी १९९१ साली दानपेट्यांचा लिलाव करण्याची पद्धत स्वीकारली. सुरुवातीला तीनच पेट्यांचा लिलाव होणार होता. तो सातवर गेला.कोंडाळं करून दानपेट्यांचा लिलाव सातत्याने होत राहिला. धार्मिक कार्यालयाऐवजी २० वर्र्षे नारळाच्या खोलीत दानपेट्या उघडल्या गेल्या. याचे बोगस पंचनामे करून सोन्या-चांदीची लूट झाली.>आमदारांसह आठ माजी नगराध्यक्षविद्यमान आ. मधुकरराव चव्हाण यांच्यासह आठ माजी नगराध्यक्षांवरही या अहवालात निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला असून, त्यांच्यावर राज्य शासनाने कारवाई करावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी : एम. जी. मांडुरके, वायचळ, जोगदंड, डॉ. सतीश भिडे, पाठक, वामनराव कदम, एस. पी. सावरगावकर, विकास नाईक, सुनील यादव नऊ तहसीलदार : बि. दा. व्यवहारे, बी. एस. कोळेकर, जी. टी. जाधव, डी. एल. तोरडकर, ए. बी. गव्हाणे, बी. जी. पवार, सतीश राऊत, एस. सी. येवलीकर, देवेंद्र कटके दहा ठेकेदार : चंदर सोंजी, बाळकृष्ण कदम, धन्यकुमार क्षीरसागर, संभाजी कदम, अरुण सोंजी, संजय कदम, दगडोबा शिंदे, अजित कदम, आनंद क्षीरसागर आणि बापू सोंजी