शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
3
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
4
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
5
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
6
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
7
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
8
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
9
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
10
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
11
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
12
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
13
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
14
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
15
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
16
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
17
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
18
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
19
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
20
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: June 29, 2016 03:07 IST

तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून पाऊस कोसळत असून, नदी, नाले, गावतलाव भरभरून वाहू लागले आहेत.

शौकत शैख,

डहाणू- तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून पाऊस कोसळत असून, नदी, नाले, गावतलाव भरभरून वाहू लागले आहेत. २६ जून २००२ च्या प्रलयाची आठवण करून देत २६ जूनला एकाच दिवशी चक्क २५१ मी.मीटर पाऊस पडला तर २७ जूनला सकाळी उघडीप देईल असे वाटत असतानाच दुपार पासून तुफान पावसाला सुरु वात झाली. मंगळवारच्या सकाळ पर्यंतच्या २४ तासात ११४.६ मी.मीटर पावसाची नोंद झाली तर आठवडा भरात ६५५.३ मी.मीटर, पाऊस पडला हा पाऊस धमणी धरण,कवडास बंधारा आणि साखरे बांधाऱ्यात क्षेत्रातही पडल्यामुळे ते बऱ्यापैकी भरले आहे.
सुरवातीलाच पाऊस सुरू होताच उतावीळ होऊन ज्या शेतकऱ्यांनी भाताचे बियाणे पेरले त्यांची मात्र या सतत पडणाऱ्या पावसामुळे पंचाईत झाली आहे. पेरलेल्या भातावर कायमचे पाणी साचून राहिल्याने त्याचे कोंब कुजू लागले आहेत. तर काही दडपून गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार भात पेरणीचे संकट ओढावले आहे. या वर्षीही भातशेती वाया जाते की काय ? या चिंतेत शेतकरी सापडला आहे. अद्यापही वेधशाळेने दोन तीन दिवस असाच पाऊस कोसळेल असा इशारा दिल्याने बळीराजाची अवस्था आणखीज बिकट झाली आहे.
आज संध्याकाळी झालेल्या तुफानी पावसाने कंक्र ाडीपूल वाणगाव येथील डी.जे फॅक्टरी आणि वरोर येथील बंधारा रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद पडली त्यामुळे अनेक वाहने अडकून पडली होती. व स्थानिकांचेही प्रचंड हाल झाले.
>जव्हारमध्ये धुवाँधार ; जनजीवन विस्कळीत; धबधब्यांवर तरुणाई उसळली
गेल्या काही दिवसांपासून रिमझिम बरसणाऱ्या पावसाने शुक्रवार पासून धुवाँधार सुरवात केलेली असून सोमवार पर्यत जोरदार पडणाऱ्या धो-धो पावसाने जव्हार शहराला चांगलेच झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्री पासून पडणाऱ्या पावसाने थोडाही वेळ उघडीप दिलेली नसल्यामुळे नागरीक कंटाळून घराबाहेर निघालेले नाहीत. रस्ते ओस पडलेले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मात्र चांगला दिलासा मिळाला आहे. काही शेतकऱ्यांनी नांगरणी करण्यास सुरवातही केलेली आहे.धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे भक्कम बांधलेली स्लॅबची घरेही गळायला लागली आहेत, त्यातून ही पाण्याची धार सुरू आहे. तर खेडो पाड्यातील आदिवासींच्या कुडाच्या, पत्र्यांच्या, कौलाच्या घराचे काय हाल झाले असतील याची कल्पनाच केलेली बरी. जिकडे तिकडे नाले, नद्या, बंधारे भरून वाहू लागले आहेत. खेडोपाड्यातून येणाऱ्या- जाणाऱ्या रस्त्यांवर, मोऱ्यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्याने काही खेडोपाड्यांचा संपर्क तुटला आहे. संततधार सुरू असल्याने शेतकरी ही दुविधेत पडले आहेत. शेतीसाठी पाऊस पाहिजे परंतु तो नियमीत असावा, अशा प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत. दरम्यान जव्हार शहर हे पर्यटन स्थळ असल्याने आणि पावसाळ्यात येथे दाभोसा, हिरडपाडा, काळमांडवी, खडखड, हनुमानपॉर्इंट, सनसेट पाँर्इंट, डॅम, जयविलास पॅलेस अशी विविध पर्यटन स्थळे असल्यामुळे पावसाळ्यात येथे असंख्य पर्यटकांची विविध पॉइंटवर गर्दी दिसत आहे. ह्या निर्सगरम्य वातावरणात पर्यटक आनंद लुटत आहेत. तर दुसरीकडे शहरात गटारे तुंबल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.