शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
5
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
6
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
7
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
8
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
9
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
10
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
11
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
13
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
14
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
15
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
16
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
17
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
18
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
19
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षातील स्मार्टकार्डमुळे प्रवाशाचा लॅपटॉप पुन्हा मिळाला

By admin | Updated: September 7, 2015 09:04 IST

स्वप्नाली लाड प्रकरणानंतर ठाणे शहर वाहतूक शाखेने ठाण्यातील रिक्षांमध्ये चालकाची माहिती देणारे स्मार्टकार्ड बसविले आहे. याच स्मार्टकार्डमुळे तसेच महिला

ठाणे : स्वप्नाली लाड प्रकरणानंतर ठाणे शहर वाहतूक शाखेने ठाण्यातील रिक्षांमध्ये चालकाची माहिती देणारे स्मार्टकार्ड बसविले आहे. याच स्मार्टकार्डमुळे तसेच महिला प्रवाशाने दाखविलेल्या तत्परतेमुळे शुक्रवारी एका प्रवाशाचा लॅपटॉप परत मिळाला.रामराज कोरी हे त्यांचा मुलगा रोनाल याच्यासह श्रीरंग सोसायटी येथून विजयवाडी, घोडबंदर येथे रिक्षाने पोहोचले. दोघेही घाईत असल्यामुळे त्यांच्याकडील बॅग रिक्षातच राहिली. या बॅगमध्ये त्यांच्या कार्यालयाची महत्त्वाची कागदपत्रे तसेच लॅपटॉपही होता. ते उतरल्यानंतर त्याच रिक्षात एक महिला प्रवासी तिथेच बसली. ही बॅग तिच्या निदर्शनास आल्यावर तिने या बॅगची रिक्षाचालकाकडे विचारपूस केली. तेव्हा, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. या महिलेने रिक्षातील स्मार्टकार्डवरूनच या चालकाचे नाव आणि पत्ताही घेतला होता. ज्या ठिकाणाहून कोरी उतरले, तिथल्या सुरक्षारक्षकाकडे या रिक्षाचा क्रमांक त्या महिलेने दिला. दरम्यान, कोरी यांनीही ही बॅग हरवल्याची तक्रार वाहतूक शाखेत दिली होती. ही तक्रार दाखल झाल्यानंतर रिक्षाच्या क्रमांकावरून रिक्षामालकाचा शोध ‘स्मार्ट आयडी’च्या साहाय्याने लावण्यात आला. रिक्षाचालक शांताराम जाधव यांच्याकडे याबाबत चौकशी केल्यानंतर ही बॅग राहिल्याचे त्यांनी मान्य केले. त्यांनी ही बॅग वाहतूक शाखेच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याकडे आणून दिली. त्यानंतर, बॅगचे मूळ मालक कोरी यांना ओळख पटवून ती सुपूर्द करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)