शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता खचल्याने वाहतूक विस्कळीत

By admin | Updated: May 30, 2014 02:14 IST

लता मंगेशकर यांच्या पेडर रोड येथील ‘प्रभू कुंज’ या राहत्या घरासमोरील रस्ता गुरुवारी सकाळी अचानक खचला.

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पेडर रोड येथील ‘प्रभू कुंज’ या राहत्या घरासमोरील रस्ता गुरुवारी सकाळी अचानक खचला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही़ मात्र, पेडर रोडवरील वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. याआधी सकाळी साडेआठच्या सुमारास केम्स कॉर्नरकडून कॅडबरी जंक्शनकडे जाणार्‍या पेडर रोडवरील रस्ता अचानक खचला. त्या वेळी पालिका आणि वाहतूक विभागाच्या अधिकार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या वेळी रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यामुळे केम्स कॉर्नरकडून महालक्ष्मी मंदिराकडे येणार्‍या वाहतुकीमधील एक लेन बंद झाली होती. परिणामी, या ठिकाणी तुरळक प्रमाणात वाहतूककोंडी होत होती. दरम्यान, सकाळीच घटनास्थळी दाखल झालेल्या पालिकेने खड्डा बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले होते. रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया घटनास्थळी उपस्थित असलेल्या पालिका अधिकार्‍याने दिली. ...म्हणून रस्ता खचला! खचलेल्या रस्त्याची पाहणी केली असता रस्त्याखालून पर्जन्यजलवाहिनी गेल्याचे लक्षात आले. या जलवाहिनीमधून होणार्‍या पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्याखालील माती आणि दगड खिळखिळीत झाले होते. मुळात ब्रिटिशांनी बांधलेल्या या वाहिनीचे काम पावसाळ्यातील पाणी वाहून नेणे इतकेच आहे.इतर ऋतूंमध्ये ती कोरडी असायला हवी. मात्र, सध्या या वाहिनीला ठिकठिकाणी मलनि:सारण वाहिन्या जोडण्यात आलेल्या आहेत. परिणामी, पावसाळ्याआधी आणि पावसाळा संपल्यानंतर जलवाहिनी कोरडी राहण्याऐवजी त्यातील प्रवाह सुरूच असतो. वाहिनीवरील दगडांवर प्रवाहाचा मारा बसल्याने तिची झीज होते. परिणामी, रस्ता खचतो. हीच परिस्थिती येथील रस्ता खचण्यास कारणीभूत असल्याची शक्यता एका पालिका अधिकार्‍याने व्यक्त केली.