शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

चार वेळा मृत्यूला हुलकावणी

By admin | Updated: June 4, 2014 01:18 IST

काळाला बहुदा अपघातातच गोपीनाथराव मुंडे यांची शिकार करायची होती. या आधी चारवेळा मुंडे यांनी मृत्युला हुलकावणी दिली आहे. मात्र, अखेर काळाने दिल्लीत त्यांना गाठले.

मनाला चटका लावला : मुंबई, सातारा, परभणी, बुलडाण्यातील आठवणी 
मुंबई : काळाला बहुदा अपघातातच गोपीनाथराव मुंडे यांची शिकार करायची होती. या आधी चारवेळा मुंडे यांनी मृत्युला हुलकावणी दिली आहे. मात्र, अखेर काळाने दिल्लीत त्यांना गाठले. 
1क् डिसेंबर 1998 साली विमान दुर्घटनेतून बालंबाल बचावले होते. त्यावेळी गोपीनाथराव महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. सातारा जिल्ह्यात विमानाने एक दिवसाच्या दौ:यावर निघाले होते. त्यांच्यासोबत भाजपाचे प्रकाश जावडेकर, स्वीय सहाय्यक माणिक मुंडे, बॉडीगार्ड सुरेंद्र जयस्वाल असे पाच जण होते. राज्य शासनाच्या मालकीचे अॅव्हेरो विमान होते. मुंबई सांताक्रुझ विमानतळावरून विमानाने आकाशात ङोप घेतली. विमान 5क् नॉटीकल (हवाई मैल) उंचीवर असताना हवेच्या दाबाने स्फोटासारखा आवाज होऊन खिडकीची काच फुटली आणि विमान भरकटले. हेलकावे खात ते तीन हजार फूट उंचीर्पयत खाली आले. कोणत्याही क्षणी काहीही घडू शकले असते. पण वैमानिक दिनशॉ यांनी परत सांताक्रुझ विमानतळावर सुखरुप उतरवले. सर्वजण सुरक्षित होते.
1 आक्टोबर 2क्क्4 रोजी गोपीनाथराव हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावले होते.  निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. मुंडे यांची चिखली आणि बुलडाण्यात सभा होती आणि ते हेलिकॉप्टरने निघाले होते. हवामान स्वच्छ होते. यावेळी त्यांच्या सोबत जावई अमित पालवे आणि दूरचित्रवाणीचे पत्रकार व कॅमेरामन होते. हेलिकॉप्टर दहा हजार फुट उंचीवर असताना ते वादळी पावसात सापडले. वातावरणामुळे हेलिकॉप्टरचा केंद्राशी असलेला संपर्क तुटला. खाली उतरण्याची सोय नाही? धोधो पाऊस पडतोय पण; अशाही परिस्थितीत पायलटने प्रसंगावधान दावखत एका शेतात हेलिकॉप्टर सुखरुप उतरवले. इकडे लोक सभेसाठी त्यांची वाट पाहात होते. तेही विसरले नव्हते. खाली उतरताच चिखल तुडवत ते हमरस्त्यावर आले.  एक ट्रक अडवला आणि चिखली गाठली. जणू काहीच घडले नाही अशा थाटात जोरदार भाषण केले. सभा जिंकली. तोर्पयत हेलिकॉटर भरकटल्याचे, ते अपघातातून बालंबाल बचावल्या वृत्त सर्वत्र वा:यासारखे पसरले होते. सभेला आलेल्या श्रोत्यांनाही ते कळले होते. त्यांनी नेता असावा तर असा अशा भावना व्यक्त करत दाद दिली.
कार अपघातातूनही गोपीनाथ मुंडे एकदा बचावले होते. 30 डिसेंबर 2006 ची ही घटना आहे. बीड जिल्ह्यातलाच एक कार्यक्रम आटोपून ते कारने परळीकडे परतत होते.  एका मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांची कार झाडावर आदळली. याही वेळी आयुष्याची दोरी बळकट ठरली.  
परभणी येथे एका कार्यक्रमात स्टेज कोसळल्याने मुंडे जखमी झाले होते.  ही घटना 4 फेब्रुवारी 2004 रोजी घडली होती.
 
कार अपघातातूनही गोपीनाथ मुंडे एकदा बचावले होते. 30 डिसेंबर 2006 ची ही घटना आहे. बीड जिल्ह्यातलाच एक कार्यक्रम आटोपून ते कारने परळीकडे परतत होते. एका मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांची कार झाडावर आदळली. याही वेळी आयुष्याची दोरी बळकट ठरली. परभणी येथे एका कार्यक्रमात स्टेज कोसळल्याने मुंडे जखमी झाले होते.  ही घटना 4 फेब्रुवारी 2004 रोजी घडली होती.