शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

३० हजारांची लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्यास अटक

By admin | Updated: August 29, 2014 00:56 IST

जमीन विक्रीच्या परवानगीसाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी ज्ञानेश भट यांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वर्धा येथील

वर्धा एसीबीची यवतमाळात कारवाई यवतमाळ : जमीन विक्रीच्या परवानगीसाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी ज्ञानेश भट यांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वर्धा येथील पथकाने ही कारवाई केली. ज्ञानेश भट यांच्याकडे विशेष भूसंपादन उपजिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार आहे. काही दिवस त्यांच्याकडे अपर जिल्हाधिकारी पदाचीही अतिरिक्त जबाबदारी होती. याच काळात लाचेचे हे प्रकरण शिजले. वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथील शेतकऱ्याची बाभूळगाव तालुक्याच्या (जि. यवतमाळ) नांदेसावंगी येथे वडिलोपार्जित जमीन आहे. प्रकल्पात गेलेल्या या शेतीतील काही भाग लाभक्षेत्रासाठी सोडावा (लेवी) लागतो. सदर सोडलेल्या जमिनीच्या विक्रीसाठी पुनर्वसन विभाग व अपर जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी लागते. ज्ञानेश शंकर भट हे यवतमाळ येथे अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रभारात असताना परवानगीचे हे प्रकरण त्यांच्या पुढे आले. त्यांनी ४० हजार रुपयांची मागणी केली. त्यांना १० हजार रुपये दिलेही गेले. हेच प्रकरण पुनर्वसन विभागात मंजुरीसाठी आले असता, भट यांनी राहिलेल्या ३० हजाराचे स्मरण सदर शेतकऱ्याला करून दिले. शेतकऱ्याने प्रकरणाची तक्रार वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अनिल लोखंडे यांच्याकडे केली. त्यानुसार लोखंडे व पोलीस निरीक्षक प्रदीप चौघळकर यांच्या पथकाने सापळा रचला. गुरुवारी सायंकाळी ५.१५ वाजता उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) ज्ञानेश भट यांना ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांच्याच कक्षात अटक करण्यात आली. या कारवाईत वर्धा एसीबीचे प्रदीप देशमुख, संजय खल्लारकर, नरेंद्र पाराशर, मनीष बोडे, पांडे, कदम यांनी सहभाग घेतला. (स्थानिक प्रतिनिधी)सहायक फौजदारही जाळ्यात यवतमाळ शहर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक दुर्गाप्रसाद दत्तप्रसाद शुक्ला (५६) यांना एका महिलेकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना गुरुवारी दुपारी ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच अटक करण्यात आली. गेल्या महिनाभरातील शहर ठाण्यातील ही तिसरी कारवाई आहे. या ट्रॅपच्या वेळी यवतमाळ एसीबीचे पथक आॅटोरिक्षामध्ये दबा धरून बसले होते. एका युवकाविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची तक्रार यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या प्रकरणात बी फायनल पाठविणे, आयपीसी न लावता प्रतिबंधात्मक कारवाईवर प्रकरण मिटविणे आणि तक्रार करणाऱ्या फिर्यादीविरुद्धच कारवाई करणे या ‘कामगिरी’साठी सदर युवकाच्या बहिणीला दोन हजाराची लाच मागण्यात आली होती. यवतमाळ एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख, निरीक्षक नंदकुमार जामकर यांच्या पथकाने हा ट्रॅप यशस्वी केला.