शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

‘ड्रोन’ डिलेव्हरीची चौकशी

By admin | Updated: May 23, 2014 04:26 IST

हवाई डिलेव्हरीद्वारे आॅर्डर केल्यापासून दहा मिनिटांच्या आत पिझ्झा तुमच्या हाती, हे फ्रान्सिस्को पीझेरियाने मुंबईकरांना दाखवलेले

मुंबई : हवाई डिलेव्हरीद्वारे आॅर्डर केल्यापासून दहा मिनिटांच्या आत पिझ्झा तुमच्या हाती, हे फ्रान्सिस्को पीझेरियाने मुंबईकरांना दाखवलेले स्वप्न प्रत्यक्षात पूर्णपणे उतरणे मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. तूर्त कंपनीच्या चाचणीची मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. ‘ड्रोन’ या रिमोटवर चालणार्‍या हवाई यंत्राद्वारे फ्रान्सिस्को कंपनीने ११ मे रोजी पिझ्झा डिलेव्हरीची चाचणी घेतली. लोअर परळ येथून वरळीच्या गगनचुंबी इमारतीत अवघ्या दहा मिनिटांत पिझ्झा पोहोचवला. कंपनीच्या या चाचणीबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच मुंबई पोलिसांच्या भुवया उंचावल्या. तोवर मात्र अशा चाचणीची पुसटशी कल्पनाही पोलिसांना नव्हती. मात्र या चाचणीची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ चौकशी सुरू केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फ्रान्सिस्को कंपनीने चाचणीआधी मुंबई पोलिसांची परवानगी घेतलेली नव्हती. रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने मुंबईच्या आकाशात उडणारी कोणतीही वस्तू, यंत्र, विमानांबद्दल आम्ही (मुंबई पोलीस) खूप गंभीर आहोत. चाचणीघेण्याआधी पोलीस परवानगी का घेतली नाही किंवा चाचणीबद्दल माहिती का दिली नाही, याचा जाब कंपनीला विचारला जाईल. हवाई वाहतूक कक्षाशी कंपनीने चाचणीची परवानगी घेतली का, याची माहिती मागवली आहे. त्यानंतर कारवाईचा निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया मध्य प्रादेशिक विभागाचे अप्पर आयुक्त मधुकर पांडे यांनी दिली. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे सावट लक्षात घेता ग्राहकांपर्यंत पिझ्झा पोहोचविण्यास ड्रोन यंत्रणा पर्याय धोकादायक ठरेल, असे मत पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व्यक्त करतात. वाहतूककोंडीमुळे पिझ्झाची डिलेव्हरी उशिराने होते. त्यावर उपाय म्हणून ड्रोनद्वारे पिझ्झाची हवाई डिलेव्हरी उतारा ठरू शकतो, असे मत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिखेल रजनी यांनी व्यक्त केले.