शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

डेंटल कॉलेजची फसवेगिरी

By admin | Updated: November 18, 2014 02:50 IST

जागेच्या कागदपत्रांची अफरातफर करून बांधकाम परवानगी मिळवून इमारत उभारणाऱ्या गार्डियन डेंटल कॉलेजची बांधकाम परवानगी पालिकेने रद्द केली आहे.

अंबरनाथ : जागेच्या कागदपत्रांची अफरातफर करून बांधकाम परवानगी मिळवून इमारत उभारणाऱ्या गार्डियन डेंटल कॉलेजची बांधकाम परवानगी पालिकेने रद्द केली आहे. त्यांनी चालू शैक्षणिक वर्षाकरिता ६७ विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने प्रवेश दिला आहे. हा प्रकार शिवसेना नगरसेवक पंढरीनाथ वारिंगे यांनी उघड केला आहे. तसेच या प्रकरणी तक्रार करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचविण्याची मागणी केली आहे. अंबरनाथ, जांभूळपाडा परिसरात एका शेतकऱ्याच्या जागेवर भले मोठे गार्डियन डेंटल कॉलेज उभारण्यात आले आहे. ज्या जागेवर हे महाविद्यालय उभारण्यात आले, त्या जागेचा मोबदला संबंधित शेतकऱ्याला अद्यापही दिलेला नाही. एवढेच नव्हेतर जागेचे खोटे दस्तऐवज तयार करून अंबरनाथ नगर परिषदेतून महाविद्यालय उभारण्यासाठी बांधकाम परवानगी मिळविण्यात आली. संबंधित शेतकऱ्याने यासंदर्भात दाद मागितल्यावर त्याच्या मागणीकडे गार्डियन डेंटल कॉलेजच्या संचालकांनी दुर्लक्ष केले. अखेर संबंधित शेतकऱ्याने शिवसेना नगरसेवक पंढरीनाथ वारिंगे यांच्याकडे हे प्रकरण नेले. त्यांनी या प्रकरणी तक्रार केल्यावर या महाविद्यालयाची बांधकाम परवानगी अंबरनाथ नगर परिषदेने कायमस्वरूपी रद्द केली. परवानगी रद्द झाल्याने अस्तित्वातील कॉलेजची इमारत अनधिकृत ठरली आहे. या अनधिकृत ठरलेल्या इमारतीतच कॉलेज पुन्हा सुरू करण्यात आले आहे. एवढेच नव्हेतर विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक करून संचालकांनी ६७ विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाकरिता प्रवेश दिला आहे. तसेच त्यांच्याकडून गडगंज शैक्षणिक फीदेखील आकारण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात महाविद्यालयाला प्रथम वर्षाकरिता प्रवेश घेण्याची कोणतीही मान्यता नसल्याची बाब वारिंगे यांनी उघडकीस आणली आहे. संचालकांच्या या मनमानीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची आणि आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान रोखण्यासाठी त्यांनी या प्रकाराची थेट तक्रार केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याकडे केली आहे. (प्रतिनिधी)